पिंपरी-चिंचवडचा सेनापती कोण असणार? : खुद्द पवारांनी सांगितली दोनच नावे
Sharad Pawarsarkarnama

पिंपरी-चिंचवडचा सेनापती कोण असणार? : खुद्द पवारांनी सांगितली दोनच नावे

माझे मत नाही, तर माझा आदेश येईल.

पिंपरी-चिंचवड : चार महिन्यांवर आलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Partha Pawar) अधिक सक्रिय व आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. मातेसमान नदीतून पैसे खाण्याच्या या भ्रष्टाचाराच्या मूळापर्यंत जाणार असल्याचा इशारा पार्थ पवार यांनी दिला होता. हीच का स्मार्ट सिटी असा प्रश्नही त्यांनी विचारला होता. पार्थ पवार व माजी आमदार विलास लांडे या जोडीने शहरातील इतर प्रश्नांतही लक्ष घालण्यास सुरवात केली आहे. पार्थ पवार (Sharad Pawar) आक्रमक झाल्याने पिंपरी-चिंचवडचे सेनापती तेच असतील असे बोलले जात होते. मात्र, आज (ता. १६ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीच्या पार्शभूमिवर पिंपरीचा दौरा केला. या वेळी पवार यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना त्यांच्या स्टाईलने उत्तरे दिली. त्याच त्यांनी पिंपरीचा सेनापती कोण असणार हेही सांगितले.

या वेळी पवार यांना पश्न विचारण्यात आला होता की, पिंपरी चिंचवडचा सेनापती कोण असणार, त्यावर पवार म्हणाले, पक्षाचे धोरण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ठरवतील. येथील पक्षाचे अध्यक्ष, आमदार आणि खासदार ठरवतील सेनापती कोण असणार आहे. त्याच बरोबर महाविकास आघाडी होईल का, यावर पवार म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार का याबाबत मी काही सांगू शकत नाही. या तीन पक्षाचे राज्याचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. ते योग्य आहे की नाही ते मला विचारतील, माझे मत नाही, तर माझा आदेश येईल. त्यावेळी मी त्यांच्या कानात सांगेन तुम्हाला सांगणार नाही, असे पवार म्हणाले.

Sharad Pawar
उद्धव ठाकरेंनंतर शरद पवारांचेही फडणवीसांवर जोरदार प्रहार!

दरम्यान, पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, पिंपरी-चिंचवड शहरावर वर्षानुवर्षे पवारांनी सत्ता गाजवली. मात्र, महापालिकेच्या मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावला अन् भाकरी फिरवली. आता पिंपरी-चिंचवड पुन्हा काबिज करण्यासाठी पार्थ पवार मैदानात उतरले आहेत. त्यांनी टि्वट करत महापालिकेती भ्रष्टाचारावर भाष्य केले होते ते की ''सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।” त्यामुळे पिंपरी महापालिकेची सर्व सुत्रे पार्थ पवार यांच्या हातात असतील असे बोलले जात होते. मात्र, खुद्द शरद पवार यांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांची नावे सांगितली आहेत.

Sharad Pawar
अमित शहा विरुद्ध संजय राऊत... थेट पहिला सामना दादरा नगर हवेलीतून!

शरद पवार देशाच्या राजकारणात सक्रिय झाल्यावर अजित पवार यांच्याकडे पिंपरी शहराची सूत्र आली. अजित पवारांनीही आपल्या कामाची छाप विकासकामांच्या माध्यमातून उमटवली. या काळात अनेक जुनेजाणते नाराज झाले. 2017 च्या निवडणुकीत अनेक मातब्बरांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपशी घरोबा केला. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली. त्यानंतर मावळ लोकसभा मतदार संघात पार्थ पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता पिंपरी-चिंचवड महापालिकेची जबाबदारी घेण्यासाठी ते पुढे आलेले आहेत. मात्र, त्यांच्या जबाबदारीवर अजून अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही, असे आजच्या वक्तव्यावरुन दिसून येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in