अजितदादांच्या नाराजीच्या चर्चेवर शरद पवारांनी स्पष्टच सांगितले

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीची पुण्यात पत्रकार परिषद झाली
Ajit Pawar, Sharad Pawar
Ajit Pawar, Sharad Pawarsarkarnama

पुणे : संपत्ती आणि सत्तेचा वापर करून स्थिर सरकार अस्थिर करायचे व त्यातून आपल्याला हवे तसे सरकार बनवायचे हे आपण गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये पाहीले. हा नवीन कार्यक्रम केंद्रातील सत्ताधारी पक्षाने आपल्या हाती घेतला आहे. जो यापूर्वी आपल्या देशात नव्हता, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली.

शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेला, त्यावरुन त्यांनी सरकारवर निशाणा साधला. यावेळी पवार म्हणाले, वेदांता कंपनीचे मालक अनिल अग्रवाल यांनी या संबंधीचा निर्णय घेतला, तो त्यांचा अधिकार आहे. एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प रत्नागिरीलाही करायचा निर्णय झाला होता. तळेगाव या भागातील चाकण, रांजणगाव हा परिसर ऑटोमोबाईलच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. मी जेव्हा सरकारमध्ये होतो तेव्हा हा परिसर ऑटोमोबाईलचा कॉरीडोर करण्याची संकल्पना होती. सुदैवाने देशातील चांगल्या कंपन्या तिथे आल्या व हा महत्त्वाचा भाग झाला, असे पवार म्हणाले.

Ajit Pawar, Sharad Pawar
मुख्यमंत्री शिंदेंनी दिलगिरी व्यक्त केली आणि भेटायलाही बोलावले !

याच वेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशना संदर्भातही भाष्य केले. पवार म्हणाले, पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या वेळी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल जे छापले गेले त्याइतका बेजबाबदारपणा मी मीडियात कधी पाहीला नव्हता. यामध्ये एक टक्काही सत्यता नाही. चार तास बसल्यानंतर माणसाला उठून जावे लागले तर याचीसुद्धा बातमी करणे, याचा अर्थ माध्यमांचा स्तर काय झाला आहे, हे दिसते.

राज्यात सत्तेत असताना मला मंत्रालयात देशातील आणि देशाबाहेरील गुंतवणुकदारांशी बोलण्यासाठी दोन तास वेळ काढायला लागायचा. महाराष्ट्रात येणाऱ्या नवीन गुंतवणुकदारांशी संवाद साधणे, त्याच्या शंका असतील त्या दूर करणे, हे काम व्हायचे. हे वाद थांबवून आज असे वातावरण नव्याने निर्माण करूया, असेही पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar, Sharad Pawar
पवारांचा सल्ला सत्ताधारी-विरोधक ऐकणार का?

राज्यकर्त्यांनी राज्याचा विचार मांडण्याऐवजी एकमेकांचे वाद सातत्याने काढले जात आहेत. माझ्या मते सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी दुषणे, वाद बंद करायला हवे आणि सगळ्यांनी महाराष्ट्रातील वातावरण कसे सुधारेल, विकासाच्या दृष्टीने आपण कसे पुढे जाऊ यावर लक्ष केंद्रीत केले पाहीजे, असेही पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in