राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते का? पवारांनी स्पष्टच सांगितले

पूर्वी महाराष्ट्रात (Maharashtra) सत्ताधारी-विरोधक यांच्यावरील टीका फक्त भाषणापुरती मर्यादित होती.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते का? पवारांनी स्पष्टच सांगितले
Sharad PawarSarkarnama

पुणे : "आपल्या धार्मिक भावना प्रत्येकाने अंत:करणात ठेवाव्यात, घरात ठेवल्या पाहिजे. धार्मिक भावनांचे प्रदर्शन करु नये. त्याच्या आधारावर अन्य घटकांच्या संबंधी एकप्रकारचा द्वेष निर्माण होऊन त्याचा परिणाम समाजावर दिसतो. महाराष्ट्रात असे वातावरण कधीच नव्हते," असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे.

पवार पुण्यात माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांचे एकेरी नाव घेऊन वेडेवाकडे बोलणे शोभत नाही, असा टोलाही पवार यांनी लगावला. पवार म्हणाले, अलिकडच्या काळात राज्यात व्यक्तिगत गोष्टी होत आहेत. पूर्वी महाराष्ट्रात सत्ताधारी-विरोधक यांच्यावरील टीका फक्त भाषणापुरती मर्यादित होती. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ही परंपरा सुरु होती. विधीमंडळात अनेक वेळा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये टोकाची चर्चा झाली होती. मात्र, ही चर्चा संपल्यानंतर एकत्र बसून राज्याच्या हितासंबंधी विचार करत असत, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. मात्र, दुर्दैवाने महाराष्ट्रात अलिकडे नाही त्या गोष्टी बघायला मिळत आहेत.

Sharad Pawar
आता निवडणूक झाल्यास..! पवारांनी फडणवीसांना चिमटा काढत करून दिली 'त्या' विजयाची आठवण

मुख्यमंत्र्यांवर धोरणात्मक टीका करण्याचा अधिकार आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांचे एकेरी नाव घेऊन त्यांच्यावर वेडेवाकडे बोलणे शोभत नाही. मुख्यमंत्री ही एक संस्था आहे, या संस्थेचा मान आपण ठेवला पाहिजे, असे पवार म्हणाले. भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या दिल्ली दौऱ्याविषयी विचारले असता पवार म्हणाले, अस्वस्थ असलेले लोक कुठले कुठले मार्ग उपलब्ध आहेत, त्याच्या खोलात जाणार. त्याचा फारसा विचार करण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रपती राजवटीची दमदाटी केली जाते. मात्र, त्याचे परिणाम होत नाही. निवडणुकीची वेळ आली तर त्याचे काय परिणाम होतात हे कोल्हापूरने सांगितले आहे, असे पवार म्हणाले.

हनुमान चालीसावरुन राज्यात सुरु झालेल्या वादावर पवार म्हणाले, "धार्मिक कार्यक्रम करायचा असेल तर तुमच्या निवासस्थानी करा. मात्र, तो कार्यक्रम माझ्या दारात करतो म्हटल्यावर माझ्याबद्दल आस्था असलेल्या सहकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली तर त्यांना दोष देता येणार नाही. येत्या काही दिवसात हे वातावरण शमेल अशी अपेक्षा आहे, असेही पवार म्हणाले.

Sharad Pawar
भडकावू भाषण करणाऱ्या राज ठाकरेंवर कारवाई का नाही ; अबू आझमींचे गृहमंत्र्यांना पत्र

या वेळी पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही टोला लगावला. ते म्हणाले, सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. १९८० मध्ये माझे सरकार बरखास्त झाले. ही बातमी मला रात्री साडेबारा वाजता मुख्य सचिवांनी सांगितली. त्याच वेळी तीन चार मित्रांना बोलावले आणि घरातले सामान आवरले. सकाळी सात वाजता मी दुसऱ्या जागी राहायला गेलो होतो, असेही पवार यांनी सांगितले. सकाळी १० वाजता वानखेडे स्टेडियमवर मॅच पाहायला गेलो. सत्ता येते जाते, त्यामुळे एवढे अस्वस्थ होण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. सध्या काही जण फार अस्वस्थ आहेत. मात्र, मी त्यांना दोष देत नाही. कारण निवडणुकीपूर्वी मी येणार, मी येणार अशा घोषणा केल्या. त्यानंतर मात्र ते घडू शकले नाही. त्यामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.