शरद पवार पुरंदरवर ठाम; विमानतळ हलवण्याला ठाम विरोध

Sharad Pawar| Purandar Airport| लोहगावचे विमानतळ संरक्षण खात्याच्या ताब्यात आहे. तेथे मर्यादा आहेत
sharad Pawar
sharad Pawar Twitter/@Sharadpawar

Sharad Pawar on Purandar airport

पुणे: आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरमध्ये झालेच पाहिजे. त्याच्यासाठी दोन जागा आहेत. जुन्या जागेला काही ना काही अडचणी येत आहेत. दुसऱ्या जागेला विरोध कमी होता. काही महिन्यापूर्वी केंद्र सरकारने दुसऱ्या जागेच्या संदर्भात प्रतिकूलता दाखवली होती. त्यातून मार्ग काढावा यासाठी संरक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली. अशी माहिती खासदार शरद पवार यांनी दिली. पुरंदर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शरद पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ असणाऱ्या पुरंदर किल्ल्याची पाहणी केली. त्यानंतर पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी नारायण पेठ (ता. पुरंदर) येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्य सरकारचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत काही महिन्यापूर्वी बैठक मी दिल्लीमध्ये बैठक घेतली होती. हा प्रश्न मिटावा असा आमचा प्रयत्न होता. नंतर या जागेला नकारार्थी निर्णय केंद्र सरकारने दिला. पुन्हा एकदा आम्ही हा प्रयत्न करणार आहोत.

sharad Pawar
AIMIM : घरातून हाकलून दिलेल्याबद्दल काय बोलणार ? योग्यवेळी उत्तर द्यायला आम्ही खंबीर..

लोहगावचे विमानतळ संरक्षण खात्याच्या ताब्यात आहे. तेथे मर्यादा आहेत. त्या विमानतळाचे विस्तारीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली. परंतु यामुळे प्रश्न सुटणार नाही. पुणे व पुण्याचा परिसर व त्यांच्याऔद्योगिक क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पुरंदरमध्ये विमानतळ करावेच लागेल.

पुरंदर विमानतळ पुरंदर पुरते मर्यादीत नाही. तर सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, खेड, जुन्नर, आंबेगाव पासून सर्व परदेशात जाणाऱ्या लोकांना याचा फायदा होणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला काही करून सांगणार आहोत. आम्ही राजकीय भूमिका बाजुला ठेवत पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्याशी देखील माझी चर्चा झालेली आहे. आपण केंद्राला काही करून जागेची सुधारणा करून हे विमानतळ झालेच पाहिजे असे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुरंदर किल्ल्याचा इतिहास मोठा आहे. सध्या हा किल्ला लष्कराच्या ताब्यात आहे. लष्कराने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या आहेत. यात राज्य सरकारने हातभार लावला पाहिजे. रायगड, शिवनेरी प्रमाणे पुरंदरकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे असे पवार यांनी सांगितले.

श्रीलंकेत सध्या जाळपोळ आहे. पण भारताची यासंदर्भात काय परिस्थिती काय असू शकते. आपल्याकडे जमेची बाजू म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्य घटना व भारताचे संवेधान. त्यामुळे आपण सुरक्षित आहोत. पण श्रीलंकेत राजकीय लोकांच्या हातातुन सत्ता गेली आहे. त्यामुळे लोक आता रस्त्यावर आहेत. आपल्या देशात लोक जागृत आहेत. याबाबतचे उदाहरण देताना इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत लोकांनी इंदिरा गांधींचा पराभव केला. नंतर दोन वर्ष सत्तेत असणार्‍या लोकांना देश चालवता आला नाही म्हणून पुढील निवडणुकीत लोकांनी पुन्हा इंदिरा गांधींना बहुमताने निवडून दिले.

sharad Pawar
ओवेसी बोकडांनी महाराष्ट्रात येऊन बडबड करू नये; ओवेसींच्या टीकेला मनसेकडून प्रत्युत्तर

कृषी क्षेत्रातल्या जाणकार लोकांची परिषद बारामती येथे होणार आहे. यासाठी केंद्रीय सडक परिवहन राज मार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निमंत्रित केलेले आहे. यासाठी पत्रकार परिषदेत येत आहेत. ते येत असल्याची कन्फर्मेशन अजून माझ्याकडे आलेले नाहीत. पण ते येतील असे मला असे वाटते, असही त्यांनी सांगितलं.

हा कायदा इंग्रजांच्या काळात १८९० साली झाला होता. त्याच्यामध्ये बदल करण्याची किंवा तो कायदा रद्द करण्याची गरज आहे. या संदर्भातले सुप्रीम कोर्टा समोर देखील जबाब दिलेला होता. आज जमाना बदलला आहे. हा कायदा दुरुस्त तरी करा किंवा ते कलम काढून टाका असे मी न्यायालयात सांगितले आहे. असे शरद पवार यांनी सांगितले.

शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांना या देशात वेगळे स्थान आहे. संकटाच्या काळात तोंड कसे द्यायचे. हे त्यांच्याकडून आपण शिकलो. ३०० ते ४०० वर्ष झाले त्यांचा हा आदर्श लोकांच्या समोर आहे. संकटाची कसलीही मालिका आली. तरी ताकतीने उभे राहण्याची भूमिका संभाजी महाराज यांनी घेतली. त्यावेळी त्यांचे वास्तव चित्र मांडणे गरजेचे होते. ते मांडले जात नाही. पुरंदर, राजगड, पन्हाळा, शिवनेरी यांचा इतिहास योग्य पद्धतीने मांडला जावा काही लोक इतिहासाचे विचित्रीकरण करीत आहेत. यातुन समाजाची भावना उद्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. खरा इतिहास तुम्ही फक्त लोकांच्या पुढे मांडला पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com