बारामती, शिरूरच्या प्रभारी केंद्रीय मंत्र्यांचा पवारांनी दोन शब्दांत संपवला विषय!

भाजपने (BJP) महाराष्ट्रातील १६ मतदार संघावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

पुणे : भाजपने (BJP) महाराष्ट्रातील १६ मतदार संघावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्या माध्यमातून केंद्रीय मंत्री मतदार संघात दौरे करत आहेत. बारामती (Baramati) लोकसभा मतदार संघात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन येणार आहेत. त्या विषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी दोनच शब्दांत उत्तर दिले.

वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यात राजकारण रंगले आहे. त्या संदर्भात शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवार यांना बारामती आणि शिरुर लोकसभा मतदार संघात केंद्रीय मंत्री दौरा करणार आहे, या विषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पवार म्हणाले, त्यांचे स्वागत आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. केंद्रीय मंत्री येणार आहेत ही चांगली गोष्ट असल्याचेही ते म्हणाले.

Sharad Pawar
काँग्रेस पक्ष सोडणार का, याबाबत पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं...

केंद्रीय मंत्र्यांना निमंत्रण देणार आहात का, असे पवार यांना विचारले असता ते म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आमंत्रीत केले होते. त्या लेव्हलच्या लोकांना मी आमंत्रीत केले होते. यांना कशाला निमंत्रण देऊ, असा टोला त्यांनी लगावला. तसेच निर्मला सितारामन या बारामतीच्या जनतेशी संवाद साधतील. त्यांची भाषा बारामतीच्या जनतेला सहज समजेल, असा खोचक टोला पवार यांनी लगावला.

Sharad Pawar
Sharad Pawar : राज्य समजून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची वाढलेली गती चांगली ; पवारांचा टोला

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीमध्ये भाजपचा खासदार निवडणूक येणार आहे, असा दावा केला आहे. तसेच निर्मला सितारामन यांच्या दौऱ्याची भाजपकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. तसेच शिरुर लोकसभा मतदार संघात केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंह यांचा दौरा सुरु आहे. रेणुका सिंह यांनी विकास हवा असेल तर भाजपचा शिरुरमध्ये कमळ फुले पाहिजे, असे सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मतदार मतदारसंघात भाजपने पक्ष संघटना बळकट करण्यावर भर दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com