Sambhaji Brigade: दौंडच्या ‘अपेक्षा’ला पवारांनी ४ वर्षांनंतरही ओळखले : संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात व्यासपीठावर बोलावून केले कौतुक

पवार यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्याकडे तिच्याबाबत चौकशी केली.
Sharad Pawar-Apeksha Tagde
Sharad Pawar-Apeksha TagdeSarkarnama

केडगाव (जि. पुणे) : आपले कौशल्य सिद्ध करत नोकरीसाठी जपानमध्ये जाऊन एकटी राहत असलेली दौंड (Daund) तालुक्यातील बोरीपार्धी येथील लेक अपेक्षा ताडगे हिचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी कौतुक केले आहे. (Sharad Pawar recognized Apeksha Tagde from Daund even after four years)

मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते अनिल ताडगे यांची ही मुलगी. अपेक्षा ही संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनाला जपानहून पुण्यात आली होती. संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनाची संकल्पना असलेली 'अहद ऑस्ट्रेलिया ते तहद कॅनडा'बाबतची अपेक्षाची क्लिप सोशल मीडियावरून मागील आठवड्यात फिरत होती. पवार यांनी ही क्लिप पाहिली होती. त्यामुळे त्यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्याकडे तिच्याबाबत चौकशी केली.

Sharad Pawar-Apeksha Tagde
राष्ट्रवादीच्या रमेश थोरातांनी भाकरी फिरवली अन दौंड खरेदी-विक्री संघावर वर्चस्व कायम राखले

अधिवेशनाला ती आली असल्याचे समजताच पवार यांनी तिला पालकांसह व्यासपीठावर बोलावून बसण्यास जागा दिली. पवार यांनी अपेक्षा हिची आस्थेवाईकपणे चौकशी केली. नोकरीनिमित्त जपानमध्ये एकटी राहण्याचे धाडस पाहून पवार यांनी समाधान व्यक्त केले. पवार यांच्या इच्छेनुसार संयोजकांनी तिला आपले मनोगत व्यक्त करण्यास सांगितले. अचानक झालेल्या या उदघोषणेमुळे अपेक्षा सुरवातीला गडबडून गेली. हे सर्व तिच्यासाठी अनपेक्षित होते.

Sharad Pawar-Apeksha Tagde
‘ते भरत गोगावले माझ्याकडून बघून सारख्या मिशा पिळत असतात’

अधिवेशनात आरक्षणाच्या मागे लागू नका, आरक्षण कधी मिळेल, कसं मिळेल हे कोणाला सांगता येत नाही, त्यापेक्षा नोकरी, उद्योग, व्यवसायासाठी देशात आणि देशाच्या बाहेर अनेक संधी आहेत. त्या युवकांनी आजमावल्या पाहिजेत, असा सूर या अधिवेशनात होता. हाच धागा पकडत शरद पवार यांनी अपेक्षा हिचे कौतुक केले. अपेक्षा ही चार वर्षांपूर्वी जपानमध्ये नोकरीनिमित्त गेली आहे. ती संगणक अभियंता असून ती सध्या वेब डेव्हलपर म्हणून काम करत आहे. जपानमध्ये जाण्यापूर्वी संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्या मध्यस्थीने अपेक्षा हिने पवार यांचे आशीर्वाद घेतले होते. तोही प्रसंग पवार यांना काल आठवला.

Sharad Pawar-Apeksha Tagde
Assembly Eession : चिमटे, आव्हान-प्रतिआव्हानांमुळे विधानसभेत रंगली खुमासदार जुगलबंदी!

‘अपेक्षा’पूर्ती झाली : अनिल ताडगे

अनिल ताडगे म्हणाले की, ‘‘मुली शिकल्या पाहिजेत, त्यांनी नोकरी, व्यवसायात पुढे आले पाहिजे. याबरोबरच महिलांना राजकीय आरक्षणामध्ये ५० टक्के वाटा मिळाला पाहिजे, या सुधारणावादी विचारांचा पवारसाहेब यांनी नेहमीच पाठपुरावा करत निर्णय घेतले आहेत. मुलीचे कौतुक होताना पाहून आनंद वाटला. आमची ‘अपेक्षा’पूर्ण झाली आहे.

Sharad Pawar-Apeksha Tagde
'अजितदादा, संधी असतानाही पवारसाहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही' : फडणवीसांनी ठेवले दुखऱ्या नसेवर बोट

कुटुंबातील सदस्यासारखी विचारपूस केली : अपेक्षा

अपेक्षा ताडगे म्हणाली की, ‘अधिवेशनातील प्रसंग माझ्यासाठी अविस्मरणीय आणि अनपेक्षित होता. कुटुंबातील सदस्यासारखी पवारसाहेब यांनी माझी विचारपूस केली. शुभेच्छा दिल्या. आरक्षणाबाबत संदिग्धता आहे, त्यामुळे मुलामुलींनी आपल्या क्षमता विस्तारीत करून नव्या वाटा शोधल्या पाहिजेत. जगात खूप मोठ्या संधी आहेत.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com