शरद पवारांनी केले माजी राज्यमंत्री भरणेंच्या कुटुंबीयांचे सांत्वन

माजी राज्यमंत्री भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई विठोबा भरणे (वय ८३) यांचे शुक्रवारी (ता. १ जुलै) निधन झाले आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

वालचंदनगर (जि. पुणे) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे जाऊन माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. या वेळी त्यांनी जुन्या आठवणीला उजाळा देत भरणेंच्या कामाबाबतही भाष्य केले. (Sharad Pawar offered condolences to the family of former Minister Bharane)

माजी राज्यमंत्री भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई विठोबा भरणे (वय ८३) यांचे शुक्रवारी (ता. १ जुलै) निधन झाले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भरणे कुटुंबांयची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. या वेळी पवारांनी अनेक जुन्या आठवणीला उजाळा दिला. इंदापूरसह बारामती तालुक्यात पूर्वी गुळाला चांगला दर मिळत होता. पण, सध्या इंदापूरचे शेतकरी द्राक्षामधून चांगले उत्पन्न घेत आहेत. इंदापूरमध्ये शैक्षणिक सुविधा उत्तम प्रतिच्या निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

Sharad Pawar
ठाकरेंनी दिलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरबाबत शिंदे म्हणाले, ‘मी त्याबाबत...’

शरद पवार हे कळस-जंक्शन मार्ग भरणेवाडीला आले. त्यावेळी त्यांनी रस्त्यांची कामे पाहून ही कामे कुणी मार्गी लावली, याची चौकशी केली, त्यावेळी त्यांच्यासोबत असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी सांगितले की, भरणेमामांनी तालुक्यातील सर्व रस्त्यांची सर्व कामे मार्गी लावली आहे. अगदी वाड्यावस्त्यांवरील रस्तेही झाल्याचे सांगितले. त्यानंतर पवारांनी भरणेंच्या कामांबाबत भाष्य केले. मुख्यमंत्री कुणीही असले तरी मतदारसंघात सर्वाधिक निधी नेणारा आमदार अशी त्यांची राज्यात ओळख आहे. देवेंद्र फडणवीसांच्या काळातही मोठ्या प्रमाणात निधी आणला होता, अशी आठवण शरद पवार यांनी या वेळी सांगितली.

Sharad Pawar
उद्धव ठाकरे आजही तुमचे नेते आहेत का..? एकनाथ शिंदेंनी दिले हे उत्तर...

कामे सांगायला कमी पडतील, ते भरणे कसले...? भरणे यांनीही लगेच इंदापूर तालुका टेलला असून खडकवसाला कालव्याचे पाणी कमी पडत आहे. मुळशी धरणाचे पाणी पिण्यासाठी वापरावे व शिल्लक पाणी इंदापूरला देण्याची मागणी त्यांनी पवारांकडे केली. पवारांनी या वेळी नेचर डेअरीचे दूध संकलन व उत्पादनाची माहिती घेतली. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार दिलीप माने यांच्यासह अनेकांनी आज दिवसभरात भरणे यांची भेट घेऊन सांत्वन केले.

Sharad Pawar
‘शिवसेनेचे ११ खासदार भाजपच्या संपर्कात’; ‘मातोश्री’वरील बैठकीस तिघांची दांडी

या वेळी पवारांचे मित्र विठ्ठल मणियार, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, नेचर डेअरीचे अध्यक्ष अर्जुन देसाई, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, संचालक बाळासाहेब पाटील, लक्ष्मण शिंगाडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, श्रीमंत ढोले, अभिजित तांबिले, विक्रम निंबाळकर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com