Sharad Pawar News :
Sharad Pawar News : Girish Bapat :

Sharad Pawar News : पक्ष कोणताही, बापटांचा सर्वांशी सुसंवाद; श्रद्धांजली सभेत शरद पवारांनी दिल्या आठवणींना उजाळा!

Girish Bapat : "५६ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत एकही दिवस सुट्टी घेतली नाही.."

Sharad Pawar News : दिवंगत खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय सभेचे आयोजन आज रविवारी (ता. १६ एप्रिल) रोजी करण्यात आले होते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेते या प्रसंगी उपस्थित होते. बालगंधर्व रंगमंदिरात ही सभा पार पडली. यावेळी शरद पवार यांनी बापटांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

शरद पवार म्हणाले, "महानगरपालिकेत चाललेलं काम यात बापटांना विशेष अस्था असायची. नागरी प्रश्नांसाठी पक्ष कोणताही असे, उद्याच्या भवितव्यासाठी एकत्रित आलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका बापटांनी घेतली. आमच्यामध्ये चर्चा व्हायची, ते पक्षाच्या गाईडलाईन्सच्या बाहेरही जातील का अशी शंका यायची. पण पक्षांच्या सूचनांकडे त्यांनी कधी तडजोड केली नाही, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं."

Sharad Pawar News :
Mahavikas Aghadi Sabha : शिवरायांच्या महाराष्ट्राला कलंक लावण्याचे काम १० महिन्यांपूर्वी झाले : सुनील केदारांचा शिवसेना बंडखोरांवर हल्लाबोल

पवार पुढे म्हणाले, "महानगरपालिकेनंतर ते विधानसभेत आले. नंतर ते मंत्री ही झाले, काही प्रश्नांमध्ये आम्हाला मार्गदर्शन करा, असे त्यांनी सांगितलं. यामध्ये पक्ष कुठला आहे, सरकार कुणाचं आहे, याचा विचार न करता सर्वसामान्य लोकांसाठी, प्रशासनाची जी जबाबदारी आपल्यावर पडलेली आहे, ती ओळखून सामान्य माणसाशी बांधिलकी ही आपण जपली पाहिजे. यासाठी ज्या कुणाकडून माहिती मिळेल, उपयुक्तता होईल त्यांच्यासोबत आपण सुसंवाद ठेवावा, याबाबत कमीपणा ठेवता कामा नये, ही सूत्रे त्यांनी घेतलेली मी पाहिली."

Sharad Pawar News :
Jayant Patil : ''कुछ तो मजबूरियां रही होंगी, यूं कोई बेवफ़ा नहीं होता...'' जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

"नंतरच्या काळात ते संसदेत आले. पीएसीचे ते अध्यक्ष होते. यावेळी त्यांनी संसंदेतील कर्मचाऱ्यांशी संवाद चांगला ठेवला. एक दिवस मी सभागृहात जात असताना, बापट काही खाण्याच्या गोष्टी या तिथल्या कर्मचाऱ्यांना देत होत्या, मी पाहिलं तर ते चितळ्यांची बाकरवडी कर्मचाऱ्यांना देत होते. तिथल्या कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं की, सेशन संपल्यावर खासदार साहेब इथे येतात, पण येताना ते मोकळ्या हातानो ते कधी येत नाहीत, आम्हाला काहीतरी पुण्याचं भरवतात आणि ते पदार्थ अतिशय चांगले असतात, शेवटच्या कर्मचाऱ्याकडेसुद्धा ते लक्ष देत होते," अशी आठवणही पवारांनी सांगितली.

Sharad Pawar News :
Pusad APMC Election : शेतकऱ्यांच्या उमेदवारीमुळे पुसद बाजार समितीत चुरस, नाईकांचीभूमिका महत्त्वपूर्ण...

"बापट कधी कधी माझ्याकडे येत असत, पुण्यातल्या प्रश्नांवर ते माझ्याशी चर्चा करत असत. पुण्यातल्या प्रश्नाबद्दल त्यांना अतीव आस्था होती. पुण्यात अनेकांसोबत मी काम केलं. मला विधानसभेत जाऊन आता ५६ वर्षे पुर्ण होतात. त्यात एकही दिवसाची सुट्टी नाही. एवढ्या वर्षात कामाच्या संबंधी, कर्तुत्वासंबंधी आपण कुठे कमी आहोत," असं चित्र बापटांनी दाखवून दिलं नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com