Sharad Pawar : लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांचे शरद पवारांकडून सांत्वन

Sharad Pawar : जगताप कुटुंबातील सर्वांची आस्थेवाईकपणे त्यांनी चौकशी केली
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama

पिंपरी : चिंचवडचे भाजप आमदार आणि पक्षाचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने नुकतेच (ता.३) निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पिंपरी-चिंचवडमधील (पिंपळे गुरव येथील) निवासस्थानी जाऊन सर्वपक्षीय नेत्यांकडून जगतापांच्या कुटुंबियांचे सांत्वन सुरु आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जगतापांच्या कुटुंबियांची (ता.६) भेट घेऊन त्यांना धीर दिला.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कालच (ता.५) जगताप कुटुंबाची प्रत्यक्ष विचारपूस केली होती. त्यावेळी त्यांनी स्व.आ. जगतापांच्या पहिल्या आमदारकीच्या निवडणुकीची आठवण सांगितली होती. आज शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील त्यांच्यासोबत होते.

Sharad Pawar
Cabinet expansion : मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता कमीच; गुडघ्याला बाशिंग बांधलेले आमदार काय करणार?

शरद पवार (Sharad Pawar) यांनी लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी कुटुंबातील सर्वांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. दुःखातून सावरण्यासाठी त्यांना धीर दिला. यावेळी दिवंगत आ. जगतापांच्या पत्नी अश्विनी, मुलगी ऐश्वर्या रेणुसे-जगताप, बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, विजय जगताप, त्यांच्या बहिणी व इतर नातेवाईक उपस्थित होते.

Sharad Pawar
ST Workers : संप केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांकडून 96 कोटींची वसुली; सदावर्तेनी केला विरोध!

दरम्यान, शरद पवार यांच्या अगोदर आज राज्य़ाचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), खासदार धनंजय महाडीक, आमदार निलेश लंके, मेघना साकोरे-बोर्डीकर, मोनिका राजळे, प्रसाद लाड, माजी खासदार अमर साबळे आदींनी जगताप कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in