Chinchwad- Kasaba By Election : शरद पवारांनी अजित पवारांना दिली मोठी जबाबदारी

राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसनेही या पोटनिवडणुकांसाठी तयारी सुरु केली आहे.
Chinchwad- Kasaba By Election : शरद पवारांनी अजित पवारांना दिली मोठी जबाबदारी

Pune By-Election : राज्यातील शिंदे फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडीतील राजकीय संघर्षांमुळे पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. एकीकडे भाजप ही निवडणूक बिनविरोध करण्याचा विचार करत असताना दुसरीकडे आता राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसनेही या पोटनिवडणुकांसाठी तयारी सुरु केली आहे. असे असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निवडणुकीबाबत एक महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे.

बारामतीत रविवारी (२२ जानेवारी) भरलेल्या कृषी प्रदर्शनात शरद पवार यांनी कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात भाष्य केले. '' मला राजकीय प्रश्न विचारू नका. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांबाबत तुम्ही अजित पवार यांना विचारा,' असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यातून एक प्रकारे ही पोटनिवडणूक जिंकण्याची सर्व जबाबदारी त्यांनी अजित पवार यांच्या खांद्यावर दिल्याचे बोलले जात आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांसाठी पुढील महिन्यात २७ फेब्रुवारीला मतदान होणार असून २ मार्चला निकाल जाहीर होणार आहेत.

Chinchwad- Kasaba By Election : शरद पवारांनी अजित पवारांना दिली मोठी जबाबदारी
MNS News : ''जा लढ,...!''; मनसेकडून 'तो' व्हिडीओ टि्वट करत बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन

तसेच, शरद पवार यांना वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील संभाव्य युतीबाबत विचारले असता, मला यासंबंधी काही माहिती नाही. मी या भानगडीत पडत नाही, असे उत्तर पवार यांनी दिले. दरम्यान, दोन दिवसांपुर्वी अजित पवार यांनीदेखील माध्यमांशी बोलताना आपण चिंचवड विधानसभा मतदारसंघासह कसबा विधानसभा मतदारसंघावरही दावा केला आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघात ज्या पक्षाची सर्वाधिक ताकद आहे त्या पक्षाला ती जागा मिळावी, अशी आमची भूमिका आहे. महाविकास आघाडीत कसबा विधानसभा मतदार संघाची जागा काँग्रेसच्या वाट्याला आलेली आहे. त्या जागेवर काँग्रेस उमेदवार देण्याची शक्यता आहे. पण याच माध्यमातून कसबा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची अधिक ताकद असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगत पवार यांनी कसबा विधानसभा मतदारसंघावर देखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा सांगितला आहे. त्यामुळे या निवडणुकीतील चुरस वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com