Sharad Pawar ; 'सायरस आणि मला ३६ मार्क मिळायचे, अभ्यास सोडून आम्ही.." पवारांनी सांगितला कॉलेजमधला किस्सा!

Saharad Pawar : ज्यांना ३६ मार्क मिळायाचे त्यांची लस जगभरात जाते.
Sharad pawar
Sharad pawar Sarkarnama

Sharad Pawar : काँग्रेसचे दिवंगत नेते व भारतीय विद्यापीठाचे संस्थापक पतंगराव कदम यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्या नावाने आज पुरस्कार प्रदान करण्यात आले. सीरम इन्स्टिट्युटचे आदर पूनावाला यांना हा पुरस्कार देण्यात आला. भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व भारती विद्यापीठ स्टुडंट हौसिंग कॉम्प्लेक्सचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या हस्ते भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल येथे पार पडले. याप्रसंगी बोलताना शरद पवार यांनी सीरम इन्स्टिट्युटचे संस्थापक यांच्यासोबतचा कॉलेडमधील एक किस्सा सांगितला.

Sharad pawar
Abdul Sattar News : ना चौकशी, ना कारवाई, सत्तार सिल्लोडमध्ये दरवर्षी घेणार कृषी महोत्सव..

शरद पवार म्हणाले, पंतगराव कदम यांच्या नावाने आज पुरस्कार ज्यांना दिला ते आदर पुनावाला, त्याच्या संस्थेचं नाव सीरम इन्स्टिट्युट. आदर ९ वर्षाचे असतील तेव्हापासून त्यांच्या कुंटुबासोबत माझा घनिष्ठ संबंध आहे. आदरचे वडील आणि मी एका वर्गात शिकलो. आम्ही कॉलेजमदध्ये असताना अभ्यास सोडून बाकीच्या क्षेत्रातच अधिक लक्ष देत होतो. आम्ही एका गोष्टीत मात्र कायम सातत्य ठेवलं. कॉलेजमधून बाहेरपडेपर्यंत आम्हाला ३६ ते ४० पर्यंत मार्क मिळवले.

Sharad pawar
Sharad Pawar : "पतंगरावांनी भारती विद्यापीठ वाढवली, पण त्यांची खरी निष्ठा मात्र..." पवारांनी जागवल्या आठवणी!

आज मात्र सायरस पुनावाला यांच्या कर्तुत्वाचा लोकांना अनुभव आला. सीरमने व्हॅक्सिन तयार केलं. आज जगामध्ये जन्म घेणाऱ्या शंभर मुलांपैकी ५० मुलं सीरमचं व्हॅक्सिन घेतात. जवळपास १६० देशात सीरमचं व्हॅक्सिन वापरलं जातं. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की, सीरमसारखी संस्था सायरसने पुण्यात उभी केली. या संस्थेचा सगळा कारभार आता आदर सांभाळतात. आनंद आहे की, ते वडीलांची गादी उत्तम रितीने चालवतात, असे पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in