Sharad Pawar म्हणाले, हा तर लहान मुलांची समजूत काढण्याचा प्रकार..

Sharad Pawar : "महाराष्ट्रात मोठे प्रकल्प आणू, असे सांगणे म्हणजे लहान मुलांची समजूत काढण्यासारखे आहे," असे पवार म्हणाले.
Sharad Pawar
Sharad Pawar sarkarnama

पुणे : वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात दावे-प्रतिदावे होत आहेत. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले आहे. ते पुण्यात पत्रकार परिषद बोलत होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. (Sharad Pawar latest news)

"वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणे हे दुदैवी, गुजरातला गेलेला हा प्रकल्प पुन्हा येणे अशक्य आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. "महाराष्ट्रात मोठे प्रकल्प आणू, असे सांगणे म्हणजे लहान मुलांची समजूत काढण्यासारखे आहे," असे पवार म्हणाले.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प (vedant project)गुजरातला गेल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारच्या (maharashtra) विरोधात आज राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसची (ncp)निदर्शने सुरु आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रबाहेर नेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापेक्षा मोठा प्रकल्प देण्याचे दिले आश्वासन दिले आहे. "पण हा केवळ आश्वासनांचा लॉलीपॉप राज्याला दिला आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यातील बालगंधर्व चौकात लॉलीपॉप आंदोलन सुरु आहे.

Sharad Pawar
गद्दार म्हटलं की त्यांचे दाबे दणाणते, गद्दार पुन्हा निवडून येत नाहीत ; अजितदादांनी शिंदे गटाला सुनावलं

"महाराष्ट्र को क्या मिला? लॉलीपॉप लॉलीपॉप," अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यात आंदोलन सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग दुसऱ्या दिवशी भाजप सरकार विरोधात आंदोलन करीत आहेत.

वेदांता फॉक्सकॉन ग्रुपचा एक लाख 54 हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता परंतु सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता गुजरातमध्ये जाणार आहे, यामुळे महाराष्ट्रातील हजारो युवक बेरोजगार होणार आहेत, असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

शरद पवार म्हणाले..

  1. वाद उकरुन काढण्यात सत्ताधारी आणि विरोधक व्यग्र आहेत.

  2. राज्य अस्थिर करण्याचा मोदी-शहांचा अजेंडा

  3. देशातील बिगर भाजप अस्थिर करण्याचा डाव

  4. विरोधक-सत्ताधारी यांनी दावे-प्रतिदावे बंद करावेत

  5. शिंदे सरकार राज्य समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

  6. वेदांता प्रकल्प गुजरातला नेला, तो मोदींनी पुन्हा महाराष्ट्रात आणावा

  7. वेदांताकडून यापूर्वी प्रकल्प महाराष्ट्रातून हलविण्यात आले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in