'सिल्वर ओक' हल्ल्यावर शांत राहण्याचे शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन...

NCP|PCMC|Sharad Pawar : समाजात अशांतता निर्माण करण्यासाठी जाणीपूर्वक काही घटक प्रयत्न करत असतात. त्यामुळे शांत रहा, असे आवाहन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
Sharad Pawar, PCMC NCP
Sharad Pawar, PCMC NCPSarkarnama

पिंपरी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष, देशाचे माजी संरक्षणमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानावर गेल्या शुक्रवारी (ता. ८ एप्रिल) एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. या बंगल्यात घुसून दगडफेक व चप्पलफेक केली. एवढ्या मोठ्या नेत्याच्या घरावर प्रथमच हल्ला झाल्याने त्याचे तीव्र पडसाद अद्याप राज्य़ात उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.१२ एप्रिल) मुंबईत जाऊन आपल्या सर्वोच्च नेत्याची भेट घेऊन विचारपूस केली.

Sharad Pawar, PCMC NCP
खासदारकी संपल्यानंतर माझी दिशा वेगळी असणार; संभाजीराजेंची गुगली

यावेळी उलट त्यांनीच तुम्ही भेटायला का आलात, शहरात सगळे ठीक आहे ना, तुम्हाला काही अडचण आहे का?, अशी उलट विचारणा भेटीला आलेल्यांना केली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, शहर प्रवक्ते योगेश बहल, महापालिकतील माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नाना काटे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, जगदिश शेट्टी, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, जेष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, पंकज भालेकर यांनी नरीमन पॉंईट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यालयात पवारांची भेट घेतली. त्यावेळी साहेबांच्या चेहऱ्यावर कसलाही ताणतणाव नव्हता. उलट त्यांनीच कशासाठी भेटायला आलात, काही अडचण आहे का, शहरात सगळे ठीक आहे ना, अशी विचाररपूस केली, असे बहल आणि लांडे यांनी या भेटीनंतर 'सरकारनामा'ला मुंबई येथून बोलताना सांगितले.

Sharad Pawar, PCMC NCP
अशी झाली कर्मचाऱ्यांकडून वसुली; संजय मुंडेंच्या दाव्यांनी खळबळ

सिल्वर ओक हल्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांत मोठा संताप शहरात असल्याचे यावेळी या शिष्टमंडळाने सांगितले. त्यावर कसलीही प्रतिक्रिया देऊ नका, आंदोलन करू नका, शांत रहा, असा सल्ला पवार यांनी दिला असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले. समाजात अशांतता निर्माण करण्यासाठी जाणीपूर्वक काही घटक प्रयत्न करत असतात. सिल्वर ओक हल्ला हे त्यातलेच एक प्रकरण होते. मात्र, तो मार्ग आपला नाही, आपण सर्वांनी शांततेनेच घ्यायचे आहे व जायचे आहे, असा आवाहनवजा सल्लाही पवार यांनी पिंपरी चिंचवडच्या पक्ष पदाधिकाऱ्यांना दिला. पोलिस त्यांचे काम करतील, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com