Chinchwad By Election: शंकर जगतापांनीही भरला उमेदवारी अर्ज; 'हे' आहे कारण?

Shankar Jagtap : ..ते दुःख उराशी बाळगून निवडून येण्यासाठी सज्ज!
Shankar Jagtap
Shankar Jagtap Sarkarnama

Pimpri chinchwad News : चिंचवड मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. जोरदार शक्तिप्रदर्शन करताना जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र,याचवेळी लक्ष्मण जगतापांचे बंधू शंकर जगतापांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अश्विनी जगताप यांनी सोमवारी (दि.६) शक्तिप्रदर्शन करत थेरगाव येथील 'ग' क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला. यात पदयात्रेत शेकडो भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिवाय लक्ष्मण जगतापांचे समर्थकदेखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. अर्ज भरताना त्यांच्यासमवेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, शंकर जगताप आदी उपस्थित होते.

भाजपकडून अश्विनी जगताप आणि शंकर जगताप या दोघांनीही उमेदवारी अर्ज घेतले होते. त्यावेळी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, पक्षाचा आदेश आम्हाला मान्य आहे आणि अश्विनी जगतापच भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सोमवारी(दि.६) अश्विनी जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर लगेच दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांचे (Laxman Jagtap) लहान बंधू शंकर जगतापांनी ही अर्ज दाखल केला. भाजपकडून खबरदारी म्हणून हा डमी अर्ज दाखल केला असण्याची शक्यता आहे.

काय आहे कारण?

लक्ष्मण जगतापांचे लहान बंधू शंकर जगतापांनीही डमी अर्ज दाखल केला आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं असतानाच त्यांनी यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. जगताप म्हणाले,भाजपच्या अधिकृत उमेदवार अश्विनी जगतापांचा अर्ज छाननीत बाद झाला तर ऐनवेळी कोणती अडचण निर्माण होऊ नये. म्हणून भाजपने हे पाऊल उचलले असू शकते. पण यानिमित्ताने शहरात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र शंकर जगतापांनी खबदारी म्हणून अर्ज भरुन ठेवला आहे, असं स्पष्ट केलं आहे.

लक्ष्मण जगताप असाच डमी अर्ज दाखल करत...

लक्ष्मण जगताप उमेदवारी अर्ज भरतानादेखील मी खबरदारी म्हणून अर्ज दाखल करत असायचो. कारण अर्जाच्या छाननीच्या वेळी अनेक अर्ज नाकारले जाऊ शकतात. त्यामुळे लक्ष्मण जगताप असा डमी अर्ज दाखल करुन ठेवचत असत. आजदेखील मी खबरदारी म्हणूनच डमी अर्ज भरून ठेवला आहे. ऐनवेळी अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होतात. त्यावेळी कोणतीही गफलत होऊ नये, यासाठी मी अर्ज भरला आहे असं शंकर जगतापांनी सांगितलं आहे.

'' दु:खं उराशी बाळगून...''

शंकर जगताप म्हणाले, दरवेळेस उमेदवारी अर्ज भरत असताना उत्साह असायचा, तो भाऊंच्या जाण्याने कमी झाला आहे. काळजावर दगड ठेवून आम्ही पोटनिवडणुकीला सामोरे जात आहोत. आज वाहिनींचा अर्ज भरायला निघालो असलो, तरी त्या दुःखातून आम्ही सावरलो नाहीत. ते दुःख उराशी बाळगून निवडून येण्यासाठी सज्ज आहोत असंही जगताप यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com