Kasba Assembly By-election : कसब्यातून रासने, घाटे, बीडकरांऐवजी शैलेश टिळक होऊ शकतात उमेदवार

Kasba Assembly By-election : निवडणूक टाळण्यासाठी शैलेश टिळक यांच्या उमेदवारीची चर्चा
Shailesh Tilak, Mukta Tilak
Shailesh Tilak, Mukta TilakSarkarnama

Kasba Assembly By-election : दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या जागांवर निवडणूक आयोगाने आज अचानकणे निवडणूक जाहीर केली. मुक्ता टिळक यांच्या निधनाला तीन आठवडे तर लक्ष्मण जगताप यांच्या निधनाला केवळ १५ दिवस झाले आहेत. इतक्या कमी काळात निवडणूक जाहीर होतील हा अंदाज कोणत्याच राजकीय पक्षाला नसताना अचानकपणे थेट निवडणुकीच्या तारखाच जाहीर झाल्याने राजकीय पक्षांमध्येदेखील गोंधळ उडाला.

पुण्यात (Pune) कसबा विधानसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा इतके दिवस दबक्या आवाजात सुरू होती. माजी नगरसेवक हेमंत रासने, धीरज घाटे यांच्यापैकी एकाला मिळणार की गणेश बीडकर यांचाही विचार होणार होणार याची चर्चा सुरू झाली आहे. या तिघांच्या नावाशिवाय दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांच्या नावाचा विचार होण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक टाळण्यासाठी शैलेश टिळक यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. शैलेश टिळक यांना उमेदवारी दिल्यास विरोधकांकडून निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अनूकुलता दर्शविली जाऊ शकते हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

Shailesh Tilak, Mukta Tilak
Chinchwad Assembly By-election : चिंचवडमध्ये जगतापांच्या कुटुंबातीलच असणार उमेदवार...

विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी कसबा मतदारसंघाचे नेतृत्व सलग २५ वर्षे केले आहे. गेली २५ वर्षे ते कसब्यातून आमदार होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून खासदार म्हणून ते निवडून आले. त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली होती. पुणे महाापलिकेत अनेक वर्षे नगरसेवक असलेल्या मुक्ता टिळक या मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या.

मतदारसंघांची पुनर्रचना २००९ मध्ये झाली. त्याआधी व त्यानंतरदेखील सलगपणे कसबा मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचे सातत्याने वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपासाठी (Bjp) पुण्यातला बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात भाजपाची मोठी ताकद आहे. त्यामुळे ज्याला उमेदवारी मिळेल तो आमदार होणार यात कोणतीही शंका नाही. मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर निवडणूक टाळण्यासाठी मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी देण्यात येऊ शकते, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

Shailesh Tilak, Mukta Tilak
Pune By-Election : कसब्यातून काँग्रेस लढणार की निवडणूक बिनविरोध होऊ देणार?

निवडणूक आयोगाने चिंचवड व कसबा विधानसभा मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याप्रमाणे येत्या २७ फेब्रुवारीला मतदान तर दोन मार्चला मतमोजणी होणार आहे. प्रदेश पातळीवर बीडकर, रासने व घाटे यांच्या नावाशिवाय शैलेश टिळक यांच्या नावावर चर्चा झाली असून शैलेश टिळक यांचे नाव अंतीम होण्याची शक्यता अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com