पंधरा दिवसापूर्वी शिवसेनेत गेलेले मनसेचे पंजाबी पुन्हा स्वगृही परतणार

पंधरा दिवसांपूर्वी शहाबाज पंजाबी यांनी संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता.
Shahbaz Punjabi
Shahbaz Punjabisarkarnama

पुणे : शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थित मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेले शहाबाज पंजाबी (Shahbaz Punjabi)हे पुन्हा स्वगृही परतणार आहेत. रविवारी (ता. २२) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत पंजाबी पुन्हा मनसेमध्ये प्रवेश करणार असल्याचे मनसेच्या सुत्रांनी सांगितले.

पंधरा दिवसांपूर्वी शहाबाज पंजाबी यांनी संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. पंजाबी हे मनसेचे (mns) पुणे शहराचे माजी अध्यक्ष वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक आहेत. शहबाज पंजाबी हे मनसे शहर वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आपली भूमिका जाहीर केल्यानंतर ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले त्यांमध्ये पंजाबी यांचाही समावेश आहे.

Shahbaz Punjabi
भीती वाटत असेल तर, राज यांनी अयोध्येला आदित्य यांच्यासोबत जावं !

मनसेने हनुमान चालीसासंदर्भात आंदोलन जाहीर केल्यानंतर कोंढवा परिसरात हनुमान चालीसा लावू देणार नाही असे वक्तव्य शहाबाज पंजाबीने केले होते. मनसेने जर हनुमान चालीसा लावला, तर आमची मुले तयार आहेत, असे वक्तव्यही पंजाबीने केले होते.मनसेचे नेते वसंत मोरे यांचे ते खंदे समर्थक मानले जातात.

Shahbaz Punjabi
प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रांना भाजपचा दणका ; आठ वर्षांनंतर कारवाई

गेल्या दोन दिवसापूर्वी पुण्यातील मनसेचे माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझीरे मनसेला (mns) सोडचिठ्ठी दिल्याचे वृत्त कालपासून माध्यमात फिरत होते. मात्र, या वृत्ताचे खंडन निलेश माझीरे (Nilesh Majhire) यांनी केलं आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करीत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. (Nilesh Majhire News)

वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले माझीरे यांनी दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे संपर्कनेते सचिन आहिर यांची भेट घेतली होती. त्यानंतर माझीरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. याबाबत माझीरे म्हणतात,"माझ्या विरोधात हे कटकारस्थान आहे,"

"मी काही दिवसापूर्वी स्वारगेट येथील कबड्डी स्पर्धेमध्ये गेलो होतो त्या ठिकाणी शिवसेनेचे नेते सचिन आहिर आले होते. त्यांना मी पुष्पगुच्छ दिला. त्याचा व्हिडिओ कालपासून व्हायरल होत आहे.पण माझं कुठेही असं स्टेटमेंट नाहीये की मी शिवसेनेत प्रवेश करतोय म्हणून. मी वसंत मोरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडणार नाहीये, माझ्या विरोधात कटकारस्थान करणाऱ्यांना एवढच सांगतो मी मनसेतच आहे.विरोधकांनी जास्त लोड घेऊ नका.लवकरच लाइव्ह येणार आहे," अशी फेसबूक पोस्ट माझीरे यांनी काल शेअर केली होती. त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी याबाबत टि्वट करून माहिती दिली आहे. मात्र, पुण्यातील सभा होणार असून मनसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज यांनी ट्वीटमध्ये केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com