Shahajibapu Patil : बारामतीच्या कृषिप्रदर्शनाची शहाजीबापूंना भुरळ : म्हणाले, "सांगोल्याचा डाग पुसून.."

Shahajibapu Patil : "बारामती अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मार्गदर्शन सार्थकी ठरला"
Shahajibapu Patil : Baramati News
Shahajibapu Patil : Baramati NewsSarkarnama

Baramati News : बारामतीमधील कृषि प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांबरोबर शिंदे-फडणविस सरकारमधील मंत्री, आमदारांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच येथील नवतंत्रज्ञानाच्या अविष्काराची भूरळ पडल्याचे दिसून आले . कृषी मंत्री अब्दुल सत्तार, शिंदेगटाचे सत्ताधारी आमदार शहाजी ( बापू ) पाटील, सुरेंद्र जेवरे यांच्यासह कृषी व पणन विभागासह महसूल आदी खात्यातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांबरोबर कृषिक प्रदर्शन पाहण्याचा आनंद लुटला.

Shahajibapu Patil : Baramati News
Narendra Modi News : मुंबई मेट्रो, रस्ते, पालिकेच्या दवाखान्यासह पंतप्रधानांच्या हस्ते हजारो कोटींच्या कामाचे उद्घाटन

दरम्यान, आमदार शाहजी(बापू) पाटील म्हणाले, "हे प्रदर्शन शेती उद्योगाची संपूर्ण माहिती देणारे ठरत आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सुरू केलेला प्रक्रिया उद्योग, महिला बचत गटांची विविध उत्पादनांची दालने लक्षवेधी आहेत. साहजिकच शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे, असे शहाजीबापू म्हणाले.

Shahajibapu Patil : Baramati News
Marathwada Teacher Constituency : उमेदवार चौदा, पण चर्चा काळे, पाटील, सोळुंकेंचीच..

ते पुढे म्हणाले, "माझा सांगोला तसा दुष्काळी, पण हा डाग पुसून टाकण्याचा मी प्रयत्न केला आहे. या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मदत करीत आहे. तसेच, आता राजेंद्र पवार बारामती अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून फळबाग व पालेभाज्या आदी पिके आधुनिक पद्धतीने घेण्यासाठी सांगोला येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे कृषिक प्रदर्शनाच्या निमित्ताने बारामती दौऱा सार्थकी ठरला आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com