राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षांसह सात जणांवर जुगार प्रकरणी गुन्हा

राजेश जाधव हा २०१६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेला माजी उपनगराध्यक्ष असून त्याच्यावर मारामारी, सावकारी, जुगार प्रकरणी एकूण सात गुन्हे दाखल आहेत.
Daund Crime News
Daund Crime NewsSarkarnama

दौंड (जि. पुणे) : दौंड शहरात (Daund) मटका जुगाराचे तब्बल ११ गुन्हे दाखल असलेला रमेश जाधव आणि विविध ०७ गुन्हे दाखल असलेला त्याचा भाऊ तथा दौंड नगरपालिकेचा माजी उपनगराध्यक्ष राजेश जाधव याच्यासह एकूण सात जणांविरूध्द मटका जुगार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. (Seven people, including a former NCP's council vice chairman charged in gambling case)

पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशाने परिविक्षाधीन आयपीएस तेगबिरसिंग संधू यांनी २६ मार्च रोजी ही कारवाई केली. डॅा. आंबेडकर चौकात आदर्श मिठाई दुकानाच्या पाठीमागील अड्ड्यावर कारवाई करून रमेश शामराव जाधव (वय ५०, रा. गोवा गल्ली, दौंड), अजय नागनाथ जाधव (वय ४९, रा. नेने चाळ, दौंड), अय्यूब मौलाबक्ष शेख (वय ५२, रा. खाटीक गल्ली, दौंड) व सौदागर सिध्दराम नडगमकर (वय ६०, रा. शालिमार चौक, दौंड) या चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून रोख २५ हजार ६२० रूपये व जुगाराचे साहित्य असा एकूण ५० हजार ८५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती हवालदार महेश गायकवाड यांनी दिली.

Daund Crime News
आता माझी बायकोही म्हणेल आपण नव्यानं लग्न करू : अजितदादांची भरसभेत मिश्किली!

त्याचबरोबर मटका जुगार चालविण्यात सहभाग असल्याने रमेश जाधव याचा भाऊ राजेश उर्फ बंटी शामराव जाधव (रा. गोवा गल्ली, दौंड) , मटक्याचे आकडे घेणारा राजू जाधव (रा. शिर्डी, जि. नगर) आणि अन्य एकाविरूध्द दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश जाधव हा २०१६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेला माजी उपनगराध्यक्ष असून त्याच्यावर मारामारी, सावकारी, जुगार प्रकरणी एकूण सात गुन्हे दाखल आहेत. तर रमेश जाधव याच्याविरूध्द जुगार प्रकरणी तब्बल ११ गुन्हे दाखल आहेत.

Daund Crime News
'शिवसेनेच्या माजी आमदाराने आदित्य ठाकरेंचा आदेश झुगारला'

तेगबिरसिंग संधू यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक सचिन कांडगे, हवालदार महेश गायकवाड व श्रीधर जगदाळे यांनी या कारवाईत भाग घेतला. पुण्यातील पथकाने कारवाई केल्याने दौंड पोलिसांची भरचौकात राजरोस सुरू असणाऱ्या अवैध व्यवसायांकडे केलेली सोईस्कर डोळेझाक या निमित्ताने उघड झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com