मुसेवाला प्रकरणात मोठी कारवाई; संतोष जाधव टोळीतील आणखी सात जणांना अटक

Crime news Pune| नारायणगाव येथील वॉटर प्लांट व्यावसायिकाला गोळ्या घालून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती
 Crime news Pune
Crime news Pune

नारायणगाव : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुसेवाला हत्या प्रकरणात अटकेत असलेला संशयित आरोपी संतोष जाधव (Santosh Jadhav) टोळीतील सात सदस्यांना अटक करण्यात आली आहे. नारायणगाव येथील वॉटर प्लांट व्यावसायिकाला गोळ्या घालून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. (Crime news Pune)

आरोपींकडून तेरा गावठी पिस्तूल, एक बुलेट कॅरियर, मॅक्झिन, बोलेरो गाडी, मोबाईल आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. या प्रकरणी मोक्का गुन्ह्यात मंचर पोलिसांनी अटक केलेला आरोपी संतोष जाधव याच्या टोळीतील वैभव शांताराम तिटकारे ( राहणार चिखली, तालुका आंबेगाव), रोहित विठ्ठल तिटकारे ,सचिन बबन तिटकारे ( दोघेही राहणार नायफड, तालुका खेड ), जिशान इलाहीबक्ष मुंढे, जयेश रतिलाल बहिरम (दोघेही राहणार घोडेगाव, तालुका आंबेगाव) जीवन सिंग दर्शनसिंग नहार, श्रीराम रमेश थोरात (दोघेही राहणार मंचर तालुका आंबेगाव) यांना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पथक व नारायणगाव पोलिस यांनी संयुक्त कारवाई करून अटक केली आहे.

 Crime news Pune
शेवटच्या क्षणी खडसेंची खेळी : ठाकूर कुणाला दणका देणार?

या बाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक ताटे म्हणाले अटक आरोपी संतोष जाधव याने सहा महिन्यापूर्वी व्हिडीओ कॉल करून नारायणगाव येथील वॉटर प्लांट व्यावसायिकाला गोळ्या घालून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती.या व्यावसायिकाने प्रतिसाद न दिल्याने पुन्हा दोन वेळा धमकी दिली होती. व्यावसायिकाने घाबरून या बाबतची तक्रार पोलीस ठाण्यात केली नाही. मात्र जाधव याला नुकतीच गुजरात येथे अटक करण्यात आली. त्या नंतर या व्यावसायिकाने नारायणगाव पोलीस ठाण्यात या बाबतची तक्रार दिली. जाधव याची गुन्ह्याची पार्श्वभूमी असताना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या प्रकरणाचा खोलवर जाऊन तपास करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार चौकशीत अटक आरोपी जाधव याने दिलेल्या माहिती वरून खंडणीच्या गुन्ह्यात जीवन सिंग नहार, श्रीराम थोरात यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून दोन गावठी पिस्तूल व तीन मोबाईल जप्त करण्यात आले. चौकशीत जाधव याने जयेश बहिरम व त्याच्या इतर साथीदारांना मध्यप्रदेश येथे गावठी पिस्तूलाचा साठा आणण्यासाठी पाठवले होते. पिस्तूलाचे वाटप वैभव तिटकारे, रोहित तिटकारे, सचिन तिटकारे, जिशान मुंढे यांना करण्यात आले अशी माहिती आरोपी नहार, श्रीराम थोरात यांनी दिली. त्या नुसार या आरोपींना अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर आरोपी वैभव तिटकारे, जिशान मुंढे,सचिन तिटकारे यांच्याकडून प्रत्येकी एक गावठी पिस्तूल व मोबाईल, रोहित तिटकारे याच्याकडून तीन गावठी पिस्तूल, एक बुलेट कॅरियर, मॅक्झिन,मोबाईल, जयेश बहिरम याच्याकडून पाच गावठी पिस्तूल, मोबाईल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी या कारवाईत एकूण तेरा गावठी पिस्तूल , एक बुलेट कॅरियर, मॅक्झिन, बोलेरो गाडी, मोबाईल आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील आरोपींकडून प्रथमच मोठया प्रमाणात गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत. जाधव व त्याच्या साथीदारांच्या अटकेमुळे ग्रामीण भागातील गुन्हेगारीला आळा बसणार आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक अशोक शेळके , सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पृथ्वीराज ताटे, किरण भालेकर, हवालदार दिपक साबळे, राजू मोमीन , विक्रम तापकीर, संदीप वारे, अक्षय नवले सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने केली आहे.

डॉ. अभिनव देशमुख (पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण) :जाधव याच्या टोळीचा बिमोड करण्यात येणार आहे. जाधव याच्या नावाने कोणाकडून खंडणी वसूल झाली असेल अथवा धमकी देऊन पैशाची मागणी केली असेल तर संबंधित व्यक्तिंनी न घाबरता पोलिसांना माहिती द्यावी. तक्रादाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. असे आश्वासन पोलिसांनीदिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com