करवसुलीसाठी प्रशासक कठोर; लांडगेंच्या मतदारसंघातील चिखलीत सर्वाधिक मिळकती जप्त

महापालिका प्रशासनाने थकित मालमत्ता तथा मिळकतकरापोटी मालमत्ता सील किंवा जप्तीची तसेच या थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्याची दुहेरी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे.
Pimpri-Chinchwad
Pimpri-Chinchwadsarkarnama

पिंपरी : कोरोनामुळे गेली दोन वर्षे पिंपरी-चिंचवडमध्ये कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर थकलेला आहे. आता कोरोना संपत चालला आहे. दुसरीकडे पालिकेची मुदत संपल्याने पदाधिकारी, नगरसेवकांचा वशिलाही राहिलेला नाही. परिणामी महापालिका प्रशासनाने थकित मालमत्ता तथा मिळकतकरापोटी मालमत्ता सील किंवा जप्तीची तसेच या थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्याची दुहेरी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. गेल्या दोन आठवड्यांत ४५३ मिळकती सील करण्यात आल्या असून त्यातील काहींचे नळ कनेक्शनही तोडण्यात आले आहेत. (Seizure action by the administrator in Pimpri Chinchwad for recovery of overdue property tax)

मालमत्ता जप्त होताच २८७ थकबाकीदारांनी १६ कोटी ८५ लाख ५९ हजार ८०१ रुपयांचा कर लगेचच जमा केला आहे. त्यानंतर त्यांच्या मिळकतींचे सील काढण्यात आले आहेत. अद्याप १०६ मालमत्ता सील असून साठ मिळकतींचे पाणीजोड तोडण्यात आलेले आहेत, अशी माहिती पालिकेच्या करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली. पिंपरी चिंचवड शहरात पाच लाख ६९ हजार ६४५ मिळकती आहेत, त्यातील सर्वाधिक रक्कम थकित असलेल्या मिळकतधारकांना जप्तीच्या नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. ती दिल्यानंतर कर न भरणाऱ्यांच्या मालमत्ता सील केल्या जात आहेत. त्यासाठी ५७९ मोठ्या थकबाकीदारांची यादी करण्यात आली आहे. या थकबाकी वसुलीचा दैनंदिन आढावा पालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील हे दररोज घेत आहेत.

Pimpri-Chinchwad
फडणवीसांचा बैलगाडा ठरला फायनलसम्राट; बैलाची किंमत ऐकून विरोधी पक्षनेतेही अवाक्‌!

यावर्षी आतापर्यंत ४८३ कोटी ५२ लाख मिळकतकर जमा झाला आहे. तर, तो साडेसहाशे कोटी रुपयांपर्यंत वसुलीचे लक्ष्य आहे. त्याकरिता या आर्थिक वर्षातील फक्त काही दिवस उरले आहेत. त्यामुळे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासनाने जप्तीची कारवाई आणखी तीव्र केली आहे. गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर ती झाली आहे. गेल्या वर्षी ५५३ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल झाला होता. जकात व त्यानंतर आलेला एलबीटीही गेल्याने आता मिळकतकर हेच काय ते एकमेव मोठे उत्पन्नाचे साधन पालिकेकडे राहिलेले आहे.

Pimpri-Chinchwad
राणेंना उच्च न्यायालयाचा दिलासा; अनधिकृत बांधकामप्रकरणी कारवाई न करण्याचे निर्देश

भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या भोसरी मतदारसंघात मोडणाऱ्या चिखली करसंकलन कार्यालय हद्दीत सर्वाधिक थकबाकीदार आहेत, त्यामुळे सर्वाधिक म्हणजे दोनशे मिळकती जप्तीची कारवाई चिखलीतच झाली आहे. तर, ७ ते २० मार्चदरम्यान वसूल झालेल्या अंदाजे १७ कोटी रुपयांच्या थकित करातील सहा कोटी २३ लाख २० हजार ३८७ रुपये एकट्या चिखली करसंकलन कार्यालयाने जमा केले आहेत. पालिकेतील मावळते सत्ताधारी भाजपचे माजी महापौर राहुल जाधव यांचा प्रभागही चिखलीतच आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com