NCP : महिलेचे अश्रू पाहून सुप्रिया सुळे थेट पोलीस ठाण्यात; काउन्सलिंग करून मोडणारा संसार सावरला

Supriya Sule News : धनकवडी येथील सुळे यांच्या भूमिकेनंतर पदाधिकाऱ्यांनाही मिळाली प्रेरणा
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama

MP Supriya Sule : संसार म्हटलं की भांड्याला भांडे लागणारंच! मात्र वादानंतर अनेकांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. परिणामी बहुतांश जणांचा संसार उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे आपल्या भोवती आहेत. पती-पत्नीत वाद असतील आणि योग्यवेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर मोडणारे संसार सावरलेलेही आपण पहिले असतील. तर अनेकांना न्यायालयाच्या चकरा मारव्या लागत असल्याचीही उदाहरणे आहेत.

Supriya Sule
Politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मनसे लढवणार का? अमित ठाकरेंनी सांगितलं..

पुण्यातील धनकवडी (Dhankawadi) येथील शरदचंद्र बहुउद्देशिय भवनमध्ये महिलांसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमासाठी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) उपस्थित आल्या होत्या. कार्यक्रमाच्या हॉलमध्ये जाण्यासाठी त्या लिफ्टमध्ये प्रवेश करणार तोच एक महिला त्यांच्याजवळ आली. त्यावेळी तिने रडत रडत कुटुंबात सुरू असलेल्या वादबाबत सुळे यांना माहिती दिली.

Supriya Sule
Mahesh Landage : ..तर महेश लांडगे आज शिवसेनेचे आमदार असते!

त्या महिलेला लिफ्टमध्ये घेत सुळे यांनी तिचं सर्वकाही ऐकून घेतण्यास सुरूवात केली. त्यावेळी महिलेचे मूल खाली राहिल्याचे लक्षात आल्यानंतर त्यास कार्यकर्त्यास आणण्यास सांगितलं. महिलेने त्यांच्या घरात सुरू असलेल्या वादाबाबत सुळे यांना माहिती दिली. नवरा त्यांना मारहाण करत असल्याचंही सांगितलं.

दरम्यान महिलेला अश्रू थांबविणं कठीण जात होते. हे पाहून सुळे यांनी महिलेला धीर दिला. तसेच कार्यक्रम झाल्यानंतर सर्वकाही ठीक करण्याचे आश्वासन दिले. तसेच कार्यकर्त्यांना पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून महिलेच्या पतीस बोलावण्यास संगितलं.

Supriya Sule
Chitra Wagh : चंद्रकांत पाटलांची तुलना थेट महात्मा फुलेंशी करत, चित्रा वाघांनी फोडलं नव्या वादाला तोंड!

कार्यक्रम झाल्यानंतर सुळे यांनी महिलेला आपल्याबरोबर घेत धनकवडी पोलीस (Dhankawadi Police) चौकीत गेल्या. तेथे पोलिसांनी महिलेच्या पतीला बोलावून घेतले होते. त्यावेळी त्यांची लहान दोन मुले बरोबर होती. त्या मुलांना बाहेर नेण्यास सांगून त्यांना खाऊ देण्यास सांगितला.

त्यानंतर पोलिसांच्या उपस्थित त्या दोघांना समोर बसवून सुळे यांनी त्यांचे काय असले ते संपूर्ण म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर त्यांचे समुपदेशन केले. पोलीस आणि कोर्ट-कचेरीतून संसाराची वाताहात होत असल्याचं पटवून दिलं. कुटुंबाचं महत्त्व सांगितलं. तसेच मुलांच्या भविष्याची जाणीव करून दिली. त्यानंतर त्या दोघांनाही त्यांचं म्हणणं पटलं. यापुढं संसार करण्याचं आश्वासन देऊन त्यांनी सुळे यांचा निरोप घेतला.

Supriya Sule
Politics : बारामतीतून 14 जिल्हा परिषद सदस्य निवडून आणणार; शिवतारेंनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग

दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांचे कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि समुपदेशकाची भूमिका पाहून पोलिसांसह पदाधिकारीही अचंबित झाले. खा. सुळे यांनी केलेल्या या मध्यस्थीमुळे त्या दाम्पत्याचा संसार मार्गी लागला. त्यामुळे खा. सुळे यांच्यासह पोलीस आणि इतर राजकीय पदाधिकाऱ्यांनाही समाधान व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com