मनसेच्या दाव्यानंतर पुण्यातील सलाहुदिन दर्ग्याची सुरक्षा वाढवली

MNS| Pune| पुण्यातील पुण्येश्‍वर आणि नारायणेश्‍वर मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्याचा दावा मनसे सरचिटणीस अजय शिंदे यांनी केला आहे.
MNS| Pune|
MNS| Pune|

Pune Mandir- mosque news

पुणे : काशीतील ज्ञानव्यापी मुद्दा तापला असताना आता पुण्यातही हे लोण पसरले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी पुण्यातील पुण्येश्‍वर आणि नारायणेश्‍वर मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्याचा खळबळजनक दावा केला. या दाव्यानंतर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुण्यातील पुण्येश्वर मंदिर आणि हजरत खवाजा शेख सलाउद्दीन दर्गाह या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

पुण्येश्वर मंदिर आणि हजरत खाजा शेख सलाहुदिन दर्गा या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून पुणेकर नागरिक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. मात्र मनसे पदाधिकारी अजय शिंदे यांनी केलेल्या दाव्यानंतर, पुणे शहरात कोणतीही सांप्रदायिक तणावाची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.

MNS| Pune|
दहा'ला दोन की करु शरद पवारांना फोन; लिंबू विकणाऱ्या 'त्या' शेतकऱ्याचा व्हिडीओ व्हायरल

हजरत ख्वाजा शेख सल्लाहुद्दिन दर्ग्याच्या ठिकाणी पुण्येश्वराचं मंदिर होतं, असा दावा मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी केला आहे. अल्लाउद्दीन खिलजीचा बडा अरब नावाचा एक सरदार पुण्यावर चाल करुन आला. त्यावेळी त्याने भगवान शंकराची दोन मंदिर उध्वस्त केली. पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही मंदिरं उध्वस्त केली. एक मंदिर शनिवारवाड्याच्या बरोबर समोर आहे. तर दुसरं मंदिर लालमहालाच्या पलीकडे कुंभार वेशिजवळ आहे. तिथे आज छोटा शेख दर्गा आहे. या सगळ्या मंदिरांवर मशिदी बनवण्यात आल्या असल्याचा दावा अजय शिंदे यांनी केला आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशिद प्रकरण जिल्हा न्यायालयाला हस्तांतरित केल्यानंतर आजपासून जिल्हा न्यायालयात या प्रकरणावर नव्यानं सुनावणी केली जाणार आहे. जिल्हा न्यायाधीश अजय कुमार विश्वेश यांच्यासमोर ही सुनावणी होणार असून पाच महिलांनी दाखल केलेल्या याचिकेसह इतर याचिकांवर आज सुनावणी होणार असल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com