पुणे शहरातल्या शाळा शुक्रवारी सुरू राहणार !

पुण्यातल्या शाळांना पावसामुळे केवळ एका दिवसाची सुटी देण्यात आली होती.
PMC Pune
PMC PuneSarkarnama

पुणे : शहरातील सर्व शिक्षण मंडळांच्या शाळा उद्या (ता. १५) सुरू राहणार आहेत. पुण्यातल्या शाळांना पावसामुळे केवळ एका दिवसाची सुटी देण्यात आली होती. सर्व शाळा उद्यापासून नियमित सुरू होतील, असे पुणे महापालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. अनेक शाळांनी परस्पर मेसेज पाठवून शाळा सोमवारी सुरू राहतील, असे मेसेज पालकांना पाठविल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. या पाश्‍र्वभूमीवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विलास कानडे (Additional Commiissioner of Pune Municipal Corporation) यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना वरील खुलासा केला आहे.

PMC Pune
बाळासाहेब थोरात यांनी सांगितले राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचे कारण...

पुणे शहर व परिसरात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आज (ता. १४) शाळांना सुट्टी जाहीर केली होती. मात्र, शहरात आज फारसा पाऊस झाला नाही.

PMC Pune
मनसेला मंत्रिपद अन् भाजपच्या कोट्यातून विधानपरिषदेच्या चर्चा; राजू पाटलांचा मोठा खुलासा

पुणे महापालिकेकडून शुक्रवारी शाळा सुरू राहणार की बंद ठेवणार याचा निर्णय लवकर होणे अपेक्षीत होते. मात्र, शाळा सुरू राहतील हे कळविण्यास सायंकाळ झाली. तत्पूर्वी शहरातील बहुतांश शाळांनी दुपारीच पालकांना शुक्रवारी शाळेला सुट्टी आहे, असे मेसेज पाठविले.

या संदर्भात बोलताना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विलास कानडे म्हणाले, ‘‘ अतिवृष्टीमुळे शाळांना केवळ आजच्या दिवसपुरतीच सुट्टी होती. शुक्रवारी पुणे शहरातील सर्व बोर्डाच्या शाळा सुरू राहतील, त्यांना सुट्टी देण्यात आलेली नाही.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in