पुण्यातील शाळा, महाविद्यालय अजून आठवडाभर बंदच : अजित पवार

ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या ४५ हजार ८१ इतकी झाली आहे. रूग्णांची संख्या वाढत असली तरी रूग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे.
पुण्यातील शाळा, महाविद्यालय अजून आठवडाभर बंदच : अजित पवार
ajit pawarsarkarnama

पुणे : : कोरोना बाधितांचा पुण्यात (Corona in Pune) एका दिवसातील गेल्या पावणेदोन वर्षातील उच्चांक आज गाठला गेला. तब्बल आठ हजार ३०८ रूग्णांची शुक्रवारी नव्याने भर पडली. ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या ४५ हजार ८१ इतकी झाली आहे. रूग्णांची संख्या वाढत असली तरी रूग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे.शहरात विषाणूजन्य तापाचे रूग्णदेखील मोठ्या संख्येने आहेत.

''पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अजून एक आठवडा तरी पुण्यातील शाळा महाविद्यालय सुरू होणार नाहीत,'' असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी शनिवारी सांगितले. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले, ''कोरोना वाढू नये यासाठीच निर्णय घेत आहोत. सर्वाना विचारात घेऊन निर्णय घेण्यात येत आहे. शुक्रवारी एका दिवसातील कोरोनाची रुग्णांची आकडेवारी १६ हजारांवर गेली आहे. पुण्याचा कोरोना दर २७ टक्के झाला आहे. त्यामुळे अजून एक आठवडा तरी पुण्यातील शाळा महाविद्यालय सुरू होणार नाहीत,''

ajit pawar
अजितदादा इमानाने काम करतात, त्याची जाहिरात करीत नाहीत!

''कोरोना संख्या वाढत असली तरी हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्यांची संख्या कमी आहे. सर्व बेड आहेत पण रुग्ण ऍडमिट नाहीत, सगळ्या हॉस्पिटलमध्ये बेड खाली आहेत, रुग्णांना त्रास होऊ देणार नाही. खासगी हॉस्पिटलच्या तक्रार येत आहेत. लसीकरणाबाबत प्रशासन गांभीर्याने घेत आहे. जिल्हयात आतापर्यंत १ कोटी ६० लाखपर्यत डोस झाले आहेत. ग्रामीण भागात ७५ टक्के, पुणे अन् पिंपरीत ५१ टक्के लसीकरण झाले आहे. ६० वर्षावरील व्यक्तीला बुस्टर डोस देण्याचा निर्णय झाला असून लवकरच ६० वर्षावरील नागरिकांना लस मिळेल,'' पवार म्हणाले.

''पर्यटन स्थळी दोन्ही लस घेतलेल्यांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर देवदर्शनासाठी जाणाऱ्या लोकांना ज्याचे दोन डोस झाले आहेत त्यांना पण परवानगी देण्यात येणार आहे. एक कोविड मुक्त गाव अभियान सुरू केलं आहे, त्यात १३८५ ग्रामपंचायत सहभागी झाल्या आहेत. पुणे विभागात हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. पुणे जिल्हयात ४४ गाव आहेत जिथं एकही कोरोना रुग्ण सापडला नाही. अनेक कारखाने सुरू झाली आहेत. अजून पुण्याची पॉझिटिव्ह रेट वाढणार आहे.दोन्ही लस घेतली तर जास्त तीव्रता राहत नाही, त्यामुळे लसीकरण गरजेचे आहे,'' असे अजित पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in