ओमिक्राॅनचा धसका पुण्यात : आठवीपर्यंतच्या शाळा तातडीने बंद, मास्क नसेल तर मोठा दंड

आज दिवसभरात पुण्यात तब्बल एक हजार १०४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

सरकारनामा ब्यूरो

पुणे : कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन उद्यापासून पुणे-पिंपरी व जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांनी आज जाहीर केला. आठवीपर्यंतच्या शाळा आपापल्या पातळीवर ‘ऑनलाइन’ पद्धतीने चालू राहतील. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात लस द्यायची असल्याने या शाळा सुरू राहतील, असे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

Ajit Pawar
भुजबळ म्हणाले; राज्यपालांना निमंत्रण देण्यास आमच्याकडूनच उशीर झाला

आज दिवसभरात पुण्यात तब्बल एक हजार १०४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी ४४४ रूग्ण सापडले होते. मात्र, आज एका दिवसात हा आकडा अकराशेवर गेला आहे.त्यामुळे आजच्या बैठकीत पुण्यासाठी निर्बंध वाढविण्यात आले आल्याची घोषणा पालकमंत्री पवार यांनी केली. पुणेकरांनी गर्दी करू नये.कोरोनाचे नियम पाळावेत रूग्णांची संख्या अशीच वाढत राहिली आणखी कडक निर्बंध लावावे लागतील, असे पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar
अशोक पवारांच्या हृदयात कंदांच्या विजयाचा काटा : विधानसभेला आव्हानाची शक्यता

मास्क नसेल तर पाचशे रूपये दंड व रस्त्यावर थुंकला तर एक हजार रूपये दंड करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. दोन लस घेतल्या असतील तरच यापुढे हॉटेल, सिनेमा थिएटर, मॉल अशा सार्वजनिक ठिकाणी प्रवेश देण्यात येणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. मास्क वापरताना सर्जिकल मास्क किंवा ‘एन-९५’ मॉस्क वापरण्याचे आवाहन पवार यांनी केले आहे.

पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

-उगाच आम्हाला कडक निर्णय घ्यायला लावू नका डोस घ्या

- पहिली ते आठवी शाळा ऑनलाइन सुरू राहतील

-आपल्या देशात 23 राज्यात तर राज्यात 11 जिल्हयात ओमयक्रोन झालेला आहे

- आता हा कसला विषाणू आहे हे पाहत बसू नका काळजी घ्या

- दर तीन दिवसांनी रुग्णाचा दर पुण्यात डबल होतोय

- पालक व विद्यार्थी हे 15 ते 18 वयोगटातील मुले लसीकरणाला चागला प्रतिसाद देत आहेत

- कापडी मास्क ऐवजी एन 95 वापरा. डिझाइन मास्क वापरू नका

-पुण्यात पॉझिटिव्हिटी दर 18 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे काळजीचे वातावरण आहे.

-केंद्राने लवकर प्रोटोकॉल कळवाव म्हणजे निर्णय लवकर घेता येतात

-दोन्ही डोस नसणाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नसेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com