Common Man Question : 'बोलो महंगाई, बेरोजगारी कम कब होगी?' : सजग नागरिकाचा राज्यकर्त्यांना थेट सवाल

PCMC Politics : निवडणूक प्रचार शेवटच्या टप्यात आल्यानंतर जसा धुरळा उडतो, तसाच तो काल पहावयास मिळाला.
Common Man Question :
Common Man Question :Sarkarnama

Pimpri-Chinchwad : कालचा रविवार (ता.२७) हा लोकसभा,विधानसभा निवडणूक प्रचार ऐन रंगात आलेला दिवस वाटला. कारण महायुती आणि आघाडी अशा दोघांनीही जाहीर सभांतून एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढल्या. त्यावर त्यांना ``आदरणीय नेताओं, तुम इधर उधर की बात मत करो! बोलो महंगाई, बेरोजगारी कम कब होगी,जबाब दो`` ! असा नेमका सवाल मारुती भापकर या सजग पिंपरी-चिंचवडकराने आज केला. त्यातून सर्वसामान्यांच्या मनातील भावना व्यक्त झाली.

Common Man Question :
Devendra Fadnavis Vs Nana Patole : जपानवरून येताच देवेंद्र फडणवीस नाना पटोलेंवर बरसले; म्हणाले...

निवडणूक प्रचार शेवटच्या टप्यात आल्यानंतर जसा धुरळा उडतो, तसाच तो काल पहावयास मिळाला. आघाडी आणि युती दोघांनीही एकमेकांवर राज्यभर हल्लाबोल केला. परभणीत शासन आपल्या दारी उपक्रमाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीला लक्ष्य केलं.हिंगोलीत ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्यातील युती सरकारवर तोफ डागली.

घाटाखाली रायगडात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई- गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून राज्य सरकारला आपल्या स्टाईलने सुनावले.मुंबईत स्वराज संघटनेच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त छत्रपती संभाजी राजेंनी आपल्या स्वभावानुसार बोलले.साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्यात शीघ्रकवी आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा संचार झाल्याचे दिसून आले.तर, बीडच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार,छगन भुजबळ,धनंजय मुंडे,हसन मुश्रीफ आदी मंत्र्यांनी शरद पवारांवर नाव न घेता निशाणा साधला.

Common Man Question :
Nitesh Rane News : देसाईंचा एन. डी . स्टुडिओ ठाकरेंना हवा होता ; राणेंचा गंभीर आरोप

काल झालेल्या वरील सर्वपक्षीय नेत्यांच्या भाषणात एकमेकांवर आरोप,प्रत्यारोप होते. नाव न घेता टीका होती. फक्त पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ, डाळी, तेल आदी दैनंदिन वस्तूंचे वाढलेले प्रचंड दर, शेतीसाठी बी बियाणे, खतांची झालेली भाववाढ व एकूणच वाढती महागाई याविषयी चकार शब्द नव्हता. त्याबद्दल मारुती भापकर यांनी खेद व्यक्त केला. बेरोजगारी कमी करण्याबाबत दिलासा देणारा निर्णय व त्याची अंमलबजावणी कशी करणार याबाबत ठोस आश्वासन या सगळ्या नेत्यांच्या भाषणात संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला मिळाले नाही, याची खूप खंत वाटली,असे ते म्हणाले. त्यामुळे त्यांनी ``आदरणीय नेताओं,आप लोग,इधर उधर की बात मत करो, महागाई बेरोजगारी कम कब होगी! इस प्रश्न का उत्तर दीजिए``? ‌असा थेट व सर्वसामान्य जनतेच्या मनातील नेमका सवाल विचारला.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in