सावंत म्हणाले; वेळ आली तर घरी बसू पण इतर पक्षात जाणार नाही !

शिवसेना सोडून मी इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. वेळ आली तर घरी बसेन पण अन्य कुठल्या पक्षाचा झेंडा हाती घेणार नाही.
सावंत म्हणाले; वेळ आली तर घरी बसू पण इतर पक्षात जाणार नाही !
Shivsena Mla Tanaji SawantSarkarnama

पुणे : माजी मंत्री आमदार तानाजी सावंत शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश करु शकतात. असं राजकीय वर्तुळात नेहमीच बोललं जात आहे. मात्र, स्वत: सावंत यांनीच या साऱ्या चर्चेचं खंडण करीत आपण शिवसेना (Shivsena) सोडून इतर कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं जाहीर केलं आहे.वेळ आली तर घरी बसू पण कोणत्याही पक्षात जाणार नाही, असे आमदार सावंत यांनी ठामपणे सांगितले आहे.

Shivsena Mla Tanaji Sawant
तुम्हाला माहितीये का, पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वात श्रीमंत का आहे?

वेळ आली तर मी घरी बसेन पण दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा झेंडा हातात घेणार नाही, असे सावंत यांनी उस्मानाबादमध्ये शिवसंपर्क अभियानात बोलताना सांगितले. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये मंत्रिपदापासून डावलल्यानंतर तानाजी सावंत शिवसेनेपासून काहीसे दुरावल्याचे दिसत आहे. युती सरकारच्या काळात मंत्रीपद सांभाळल्यानंतर आता सक्रिय नसल्यामुळे, त्याचबरोबर जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांशी अधून-मधून खटके उडत असल्याने आमदार सावंत शिवसेना सोडणार अशी चर्चा नेहमी सुरू असते. या साऱ्या चर्चांना आमदार सावंत यांनी पूर्णविराम दिला आहे.

Shivsena Mla Tanaji Sawant
राज्यसभा निवडणूक; कॉंग्रेसच्या भूमिकेने शिवसेनेचीच होणार कोंडी ?

या संदर्भात बोलताना आमदार सावंत म्हणाले, ‘‘ शिवसेना सोडून मी इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. वेळ आली तर घरी बसेन पण अन्य कुठल्या पक्षाचा झेंडा हाती घेणार नाही. शिवसेना माझ्या घरात, माझ्या मनात आहे. धाराशिव जिल्ह्यावर शिवसेनेचा भगवा फडकविणार हे वचन देतो.’’ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसैनिक आणि तरुणांची बैठक बोलवावी. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना मान मिळायला हवा, अशी अपेक्षा सावंत यांनी व्यक्त केली.

आमदार सावंत युती सरकारमध्ये जलसंधारण मंत्री होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना डावलण्यात आलं. त्यामुळे सावंत नाराज असल्याची चर्चा आहे. हिवाळी अधिवेशनावेळी २२ डिसेंबर २०२२ रोजी फडणवीसांच्या भेटीसाठी चांगलीच घुटमळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तुळजापूरचे भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मध्यस्तीनंतर तानाजी सावंत यांनी फडणवीसांची धावती भेट घेतल्याचं चित्र विधानभवन परिसरात पाहायला मिळालं होतं. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचं कामकाज संपल्यानंतर सावंत यांनी फडणवीसांची भेट घेतली. दरम्यान, स्वत:च्या साखर कारखान्याच्या मुद्द्यावरुन ही भेट झाल्याचं सावंतांच्या निकटवर्तीयांकडून त्यावेळी सांगण्यात आलं होतं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in