पुणे विद्यापीठात लवकरच सावित्रीबाई फुलेंचा पुतळा : भुजबळ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (pune university) सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा (savitribai phule statue) उभारण्यात येणार आहे. या कामाचा आढावा छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी घेतला.
chhagan bhujbal, pune university
chhagan bhujbal, pune universitysarkarnama

पुणे : राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी गुरुवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला (pune university) भेट दिली. विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा (savitribai phule statue) उभारण्यात येणार आहे. या कामाचा आढावा छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी घेतला. विद्यापीठातील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची देखील त्यांनी पाहणी केली.

छगन भुजबळ म्हणाले की, या विषयात वाद वगैरे काही नाही, कामाला सुरुवात झाली होती, सूचना आल्या आहेत त्यावर आम्ही विचार करीत आहोत. पुणे विद्यापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचा पुतळा आहे. विद्यापीठात सावित्रीबाईंचा पुतळा असावा, अशी मागणी होती, 3 जानेवारीला या पुतळ्याची स्थापना होईल असे नियोजन आहे. काही संस्थाचं म्हणणं आहे की विद्यापीठाच्या मुख्य इमारती जवळ जो केंद्रबिंदू आहे त्या ठिकाणी सावित्रीबाईंचा पुतळा असावा, अशी मागणी आहे.

''जागा निवडीबाबत एकमत करु, आणि निर्णय घेऊ. पुतळा तयार करण्याचे काम सुरु आहे. सावित्रीबाईंच्या जन्मदिनी या पुतळ्याची स्थापना व्हावी, अशी पुतळा समितीच्या सदस्यांचे मत आहे. विद्यापीठात सावित्रीबाईंचा पुतळा बसविण्यासाठी अनेक जागा सूचविण्यात आल्या आहेत. पण मुख्य इमारतीजवळ हा पुतला असावा, असं अनेकांचे मत आहे. याबाबत पुतळा समितीचे पदाधिकारी बैठकीत निर्णय घेतील,'' असे भुजबळ यांनी पत्रकारांना सांगितले.

CNGचा पुण्यात 'भडका' महिनाभरात दोन वेळा दरवाढ

पुणे : दिवाळीत पेट्रोल पाच रुपयांनी आणि डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला होता. हा दिलास अद्याप कायम असून त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले नाहीत. मात्र आता सीएनजीचा (CNG) भडका होत असल्याचे दिसते. काही दिवसापासून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा सामना केल्यानंतर आता पुणेकरांना (PUNE)आता 'सीएनजी'च्या (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) दरवाढीचाही दणका बसला आहे. सीएनजीचा (CNG) वापर करीत असलेल्या अनेक वाहनधारकांना यामुळे आर्थिक झटका बसला आहे. गुरुपासून सीएनजी एक रुपये 80 पैशांनी महागले आहे. त्यामुळे आता शहरात एक किलो सीएनजीसाठी ६३. ९० रुपये मोजावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com