सातारा जिल्ह्यात २०५ नगरसेवक होणार, नवीन शासन निर्णयामुळे इच्छुकांना लॉटरी

नगरपालिका आणि महापालिकांच्या नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा प्रस्ताव काल मंजूर करण्यात आला आहे.
Satara Palika
Satara Palika Sarkarnama

सातारा : राज्यातील नगरपालिका आणि महापालिकांच्या नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा प्रस्ताव काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. यानुसार सातारा जिल्ह्यातील ८ नगरपालिकांमध्ये तब्बल २५ नगरसेवक वाढणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे सर्व पक्षातील अनेक इच्छुकांना लॉटरी लागणार आहे. यामध्ये सर्वाधिक फायदा सातारा पालिकेला होणार असून नवीन निकषांनुसार इथली नगरसेवक संख्या ५६ च्या घरात जाण्याची शक्यता आहे.

Satara Palika
दूचाकीवरून गृहराज्यमंत्री पोहोचले सातारा शहर पोलिस ठाण्यात; पोलिसांची घेतली झाडाझडती

सातारा जिल्ह्यात ९ नगरपालिका व ७ नगरपंचायती आहेत. या ९ पालिकांपैकी मलकापूरची निवडणूक झालेली आहे. त्यामुळे ८ नगरपालिकांची नगरसेवक संख्या नव्या निर्णयानुसार १५ टक्क्यांनी वाढणार आहे. यामध्ये मुळचे ४० नगरसेवक असलेल्या सातारा पालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर ही संख्या ४८ झाली होती. आता शासनाच्या नव्या निर्णयानुसार सातारा पालिकेत ८ नगरसेवक वाढणार आहेत. त्यामुळे इथली नगरसेवकांची संख्या ५६ होणार आहे.

यासोबतच कराड पालिकेत सध्याची नगरसेवक संख्या २९ असून इथे ४, तर फलटण पालिकेत २५ नगरसेवक असून तिथे ३ नगरसेवक वाढणार आहेत. तसेच वाई पालिकेत २० नगरसेवक असून तिथेही ३ नगरसेवक वाढणार आहेत. महाबळेश्वर, पाचगणी, म्हसवड, रहिमतपूर पालिकेत प्रत्येकी १७ नगरसेवक असून इथे प्रत्येकी २ नगरसेवक वाढणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण नगरसेवकांची संख्या १८० वरुन २०५ होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com