सासवड दुहेरी हत्याकांड : शिवतारे-जगतापांच्या आरोपांनंतर अभिनव देशमुखांचा मोठा निर्णय

Saswad double murder | Abhinav Deshmukh | vijay Shivtare | Sanjay Jagtap : सासवड दुहेरी हत्याकांड आमदार जगतापांनी दडपलं पण कर्तबगार देशमुखांनी बाहेर काढलं
Vijay Shivtare-Sanjay Jagtap
Vijay Shivtare-Sanjay JagtapSarkarnama

सासवड : काही दिवसांपूर्वी सासवड (ता.पुरंदर) शहराच्या ताथेवाडी कट्ट्यावर उन्हातून सुरक्षिता मिळावे म्हणून विश्रांतीसाठी बसलेल्या ४ कचरा वेचकांना कट्ट्यानजिक अंडा भुर्जीची हातगाडी लावणाऱ्याने एका विक्रेत्याने येथे का बसला असे म्हणत मारहाण करून आणि अंगावर उकळते पाणी ओतून जखमी केले होते. दुर्देवाने यात एका ५० वर्षे वयाच्या आणि दुसऱ्या ६० वर्षे वयाच्या पुरुषाचा मृत्यू झाला होता. तर अन्य दोन जखमी व घटनेचे साक्षीदार लक्ष्मीकांत नाथ्याबा कदम व शेवंताबाई जाधव यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. (Saswad double murder)

या प्रकरणात अंडाभुर्जी हातगाडी चालक आणि आरोपी निलेश उर्फ पप्पु जयवंत जगताप (रा. ताथेवाडी, सासवड ता. पुरंदर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी ३० मे रोजी रात्री उशिरा त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याची पोलीस कोठडी काल ३ जून अखेर संपली. त्यामुळे पुन्हा न्यायालयात त्यास हजर केले असता, त्यास सोमवार ६ जूनपर्यंत पुन्हा पोलीस कोठडी वाढविल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.

दरम्यान या प्रकरणात छडा लागल्यानंतर पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी पोलिस आणि डॉक्टरांवर गंभीर आरोप केले होते. ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांना हाताशी धरून हे मृत्यू उपासमारीने झाल्याचा निष्कर्ष काढला होता. कसलाही तपास न करता पोलिस आणि डॉक्टरांनी ही फाईल बंद करून टाकली होती. पोलिसांनीही अकस्मित मृत्यू म्हणून सासवड पोलिसांनी नोंद केली आणि संगनमताने ही फाईल बंद केली.

तसेच सासवड आणि जेजुरी पोलीस ठाण्याच्या कारभारात संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) आणि त्यांचा एक सहकारी प्रचंड ढवळाढवळ करत आहेत, असे आरोप केले होते. त्यावर संजय जगताप यांनी या प्रकरणाशी आपला किंवा आपल्या कोणत्याही कार्यकर्त्यांचा कसालही संबंध नसल्याचे म्हटले होते.

मात्र या सगळ्या आरोप-प्रत्यारोपानंतर पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख (Abhinav Deshmukh) यांनी या प्रकरणात मोठा निर्णय घेतला आहे. आज अभिनव देशमुख यांनी सासवडला भेट देत तपासाची माहिती घेतली. याबाबत विचारले असता, पोलीस उपाधीक्षक धनंजय पाटील म्हणाले, या दुहेरी हत्याकांडाचे तपास अधिकारी यापूर्वी सासवडचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप होते. मात्र तपासात कोण्यात्याही त्रुटी राहु नयेत, तपास अधिक चांगला आणि गतिमान व्हावा म्हणून जिल्हा अधीक्षकांनी काल रात्रीच तपास अधिकारी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे मी स्वतः (पोलीस उपाधीक्षक धनंजय पाटील) तपास अधिकारी राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in