आता सरपंचांनाही हवी आमदारकी; थेट शरद पवारांनाच घातलं साकडं

Sarpanch | MLA | Sharad Pawar : आधी मतदानाचा हक्क अन् आता थेट आमदारकीची मागणी
आता सरपंचांनाही हवी आमदारकी; थेट शरद पवारांनाच घातलं साकडं
Sharad PawarSarkarnama

वडगाव : राज्यातील ग्रामपंचायत आणि पंचायत समिती सदस्यांना विधानपरिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळावा ही मागणी असतानाच आता राज्यातील सरपंचानी आपल्यासाठी ६ विभागात ६ आमदार मतदारसंघ निर्माण करावेत अशी मागणी केली आहे. पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेऊन सरपंचांच्या विविध मागण्याचे निवेदन दिले. यावेळी पवार यांनी ग्रामीण महाराष्ट्र पुढे घेऊन जाण्यात सरपंच (Sarpanch) व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मोठे योगदान असते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला आपल्या मागण्या बाबत सकारात्मक निर्णय घ्यायला लावू असे आश्वासन दिले.

काय म्हटले आहे निवेदनात?

ग्रामपंचायतीचे उत्त्पन्न वाढवून व करांची वसुली करण्यासाठी मदत करून ग्रामपंचायती स्वायत्त संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम कराव्यात. सरपंच पदासाठी सहा विभागात सहा राखीव आमदार मतदारसंघ निर्माण करावेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आमदार निवडणुकीत पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य यांना मतदानाचा हक्क मिळावा. सरपंच - उपसरपंचाच्या मानधनात भरीव वाढ व्हावी. ग्रामपंचायत सदस्यांच्या मिटिंग उपस्थिती भत्त्यात वाढ व्हावी. मुंबईमध्ये भव्य सरपंच भवन निर्माण करावे. त्यामध्ये निवास व्यवस्था, कॉन्फरन्स हॉल, लायब्ररी असावी. सरपंच निवड सदस्यातून करण्याऐवजी पूर्वीप्रमाणे जनतेतून व्हावी, आदी मागण्या शिष्टमंडळाने केल्या.

Sharad Pawar
IPS अधिकारी कृष्णप्रकाश यांची संपत्ती किती? ही घ्या यादी...

पवार यांनी यावेळी दूरध्वनीद्वारे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनाही चर्चेत सहभागी करून घेतले होते. गाव - खेड्यांचा विकास साधायचा असेल तर सरपंच व सहकारी यांना बळ दिले पाहिजे असे पवार यांनी उपस्थितांना सूचित केले. अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाच्या विनंतीनुसार लवकरच ग्राम विकास, शालेय शिक्षण विभाग, स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग, कृषी विभाग आदी ग्रामीण भागाशी व ग्रामपंचायतीशी निगडित सर्व खात्यांची संयुक्त बैठक लवकरच आयोजित करावी अशी सूचना पवार यांनी मुश्रीफ यांना केली.

Sharad Pawar
ठाकरेंना पुन्हा आव्हान देणं राणांना महागात पडणार? सरकारी वकीलांनी स्पष्टचं सांगितलं...

या बैठकीमुळे ग्रामीण महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीत काम करणारे सरपंच व सहकाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागतील अशी आशा शिष्टमंडळाने व्यक्त केली. यावेळी संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील, विधिद्य ऍड. श्रीराम पिंगळे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.