महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी सरोज पाटील यांची निवड

सरोज पाटील (Saroj Patil) या दिवंगत प्रा. एन.डी. पाटील (N.D.Patil) यांच्या पत्नी आहेत.
Saroj Patil
Saroj PatilSarkarnama

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (Maharashtra Andhashraddha nirmulan samiti) अध्यक्षपदी सरोज पाटील ( Saroj Patil) यांची निवड झाली आहे. समितीच्या राज्य कार्यकारिणीच्या ऑनलाईन बैठकीमध्ये एकमताने सरोज पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महाराष्ट्र अंनिसच्या विश्वस्त मंडळानेही पाटील यांच्या नावाला मान्यता दिली आहे.

समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील (N.D. Patil) यांचे नुकतेच निधन झाले. प्रा. पाटील यांच्या निधनानंतर त्यांची जागा रिक्त झाली होती. त्यानंतर समितीच्या अध्यक्षपदासाठी अनेक कार्यकर्त्यांकडून सरोज पाटील यांचे नाव सुचविण्यात आले. सरोज पाटील यांनीही ही जबाबदारी स्वीकारण्यास मान्यता दिली.

Saroj Patil
अण्णांचे अमित शहांना पत्र: वैयक्तिक स्वार्थासाठी सहकारी कारखाने विकलेत, तातडीने चौकशी करा

कोण आहेत सरोज पाटील?

सरोज पाटील या दिवंगत प्रा. एन.डी. पाटील यांच्या पत्नी आहेत. सत्यशोधक चळवळीचा विचार मानणाऱ्या कुटुंबात सरोजताईंचा जन्म झाला. सत्यशोधक परंपरेतील विवेकवादी विचार उचलून धरणारे एन. डी. पाटील त्यांना पती म्हणून लाभले. सरोज पाटील या देखील संघटनेच्या स्थापनेपासून कृतिशीलपणे समितीशी जोडल्या गेलेल्या आहेत. अंनिस संघटनेतील कार्यकर्त्यांशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. संघटनेचे संस्थापक दिवंगत कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याशी त्यांचे वैचारिक नाते आहे. सरोज पाटील रयत शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या सदस्यादेखील आहेत.

सरोज पाटील यांनी बी. ए. बी. एड. केल्यानंतर पूढील दहा वर्षे शिक्षक आणि 25 वर्षे मुख्याध्यापक म्हणून काम केले. पटसंख्येपासून ते गुणवत्तेपर्यंत सर्व बाजूंनी मागे पडलेल्या वंचित वर्गातील मुलांच्या शाळा गजबजवून टाकण्याचे काम त्यांनी केले, जे आजतागायत अखंड चालू आहे. विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन त्यांना रोजगाराभिमुख करणारे प्रशिक्षण देण्याची व्यवस्थाही त्यांनी सुरू केली. यासोबतच आजूबाजूच्या समाजातील प्रतिष्ठित मंडळींना शाळेशी जोडून घेत त्यांच्या सहकार्यातून दरवर्षी 250 मुलामुलींना दत्तक पालक योजनेचा लाभ मिळवून दिला. आता त्यांच्या या शाळेतील त्यांचे दोन विद्यार्थी आमदार तर दहा विद्यार्थी नगरसेवक झाले आहेत.

Saroj Patil
शिवसेना जन्मायच्या आधी भाजपचा आमदार होता...

सरोज पाटील यांच्या कामाची दाखल घेऊन राज्यसरकारने त्यांना राज्य पुरस्काराने व मुंबई महापालिकेने महापौर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. परिसरात वृक्षारोपण करणे, झाडांचे संगोपण करणे यांसारख्या कामात सरोज पाटील यांनी विद्यार्थ्यांना सहभागी करुने घेतले. या कामासाठी सलग सात वर्षे त्यांच्या शाळेला राज्यपालांच्या हस्ते देण्यात येणारा वृक्ष सन्मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. निवृत्तीनंतर सरोज पाटील यांनी ढवळीगावातील शाळेकडेही लक्ष दिले. एक हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील शाळेत आजूबाजूच्या 12 गावांमधून मुले शिक्षणासाठी येतात. याचबरोबर, सरोज पाटील इस्लामपूरातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या सचिवदेखील आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com