Sarkarnama Impact : पन्नालाल सुराणांकडे लाच मागणारे अधिकारी बडतर्फ होणार ; फडणवीसांचे आदेश!

Sarkarnama Impact : सरकारनामाच्या बातमीची दखल घेत अजित पवार यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला.
Ajit Pawar and Devendra Fadanvis
Ajit Pawar and Devendra FadanvisSarkarnama

Sarkarnama Impact : स्वातंत्र्य लढ्यातील सैनिक व राष्ट्र सेवा दलाचे नेते पन्नालाल सुराणा यांच्या 'आपलं घर' या अनाथालयाला मागील अनेक वर्षांपासून सरकारी अनुदान मिळत नव्हते. आता प्रलंबित असलेला अनुदान तातडीने उपलब्ध करून देण्याचा आदेशच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि.२९ डिसें) विधानसभेत दिला. तसेच, सुराणा यांच्याकडे लाचेची मागणी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल, दोषी आढळल्यास बडतर्फ केले जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. सरकारनामाने याबाबत बातमी दिली होती. याची दखल घेत आता यावर विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता.

Ajit Pawar and Devendra Fadanvis
Narvekar No-Confidence Motion : पवारांची सही असती तर बरं झालं असतं; पण, एका वर्षात अविश्वास... : विधीमंडळ माजी सचिवांचे मोठे भाष्य

३० सप्टेंबर १९९२ रोजी झालेल्या भूकंपात, लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातील आई-वडील गमावलेल्या, अनाथ मुलांसाठी सुराणा यांनी अपना घर हे अनाथालय सुरू केले. उस्मानाबद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात नळदुर्ग येथे आपलं घर हे अनाथालय ऑक्टोबर १९९३ मध्ये सुरू केले आहे. मात्र, काही किरकोळ त्रुटींचे कारण दाखवत महिला व बालविकास विभागाकडून २०१३-१४ आणि २०१४-१५ या वर्षांचे एकूण २५ लाख १२ हजार रुपये अनुदान अजूनही अनाथालयाला दिलेले नाही.

यासंबंधी सुराणा आणि त्यांच्या अपना घरच्या सहकारी, कार्यकर्त्यांनी बालविकास विभागातील अधिकाऱ्यांशी भेट घेऊन विचारणा केली असता, आता तुम्ही काळाप्रमाणे बदला, त्याशिवाय काम होणार नाही, असे तेथील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. राष्ट्र सेवा दलातील पुण्यातल्या कार्यकर्ते यांनीही असेच उत्तर दिलं गेलं. या बाबतची बातमी सरकारनामाने यापूर्वीच प्रसिद्ध केले होते.

नागपूर येथील अधिवेशनामध्ये विधानसभेत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी याविषयीचा मुद्दा उपस्थित केला होता. अजित पवार म्हणाले, सुराणा यांच्यासारख्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकाला सरकारी अनुदान मिळविण्यासाठी, या प्रकारचा अनुभव येत असेल तर, राज्याचा कारभार काय पद्धतीने सुरू आहे, याची कल्पना येते. लाच मागण्याऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी. सुराणा यांच्या संस्थेचे अनुदान त्यांना देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. पवारांनी मागणी करताना, या वेळी सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. फडणवीस यांनी पवारांच्या या मागणची दखल घेतली.

फडणवीस म्हणाले, सुराणा यांच्यासारख्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकाकडे लाच मागणे, ही फार गंभीर घटना आहे.संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर बडतर्फी केली जाईल." तसेच संस्थेचे प्रलंबित अनुदानही लगेच वितरीत करण्याचे आदेश त्यांनी दिले. 

Ajit Pawar and Devendra Fadanvis
Hingoli Farmers news : फडणवीस खोटं बोलले; शेतकऱ्याची पोलीसात तक्रार

दरम्यान, सुराणा यांना त्यांच्या संस्थेचे अनुदान देण्यात यावे, त्यांच्याकडून लाच मागण्याऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनीही २१ डिसेंबर रोजी विधानसभेत केली होती. राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. तसेच अनुदान वितरीत करण्याचीही प्रक्रिया सुरू केलेली आहे, असेही सांगितले होते. परंतु, त्यावर पुढे कसलीही कार्यवाही न झाल्यामुळे अजित पवार यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com