Cricketnama : राष्ट्रवादीचा मोठा विजय; शिवसेनेला २२ धावांनी चारली धूळ

Sarkarnama | Cricketnama : प्रशांत जगतापांचे यशस्वी नेतृत्व
Cricketnama : राष्ट्रवादीचा मोठा विजय; शिवसेनेला २२ धावांनी चारली धूळ
Shivsena-NCPSarkarnama

मी आधीच सांगितले होते राष्ट्रवादी जिंकणार. आता महापालिका देखील राष्ट्रवादीच जिंकणार. महापौर राष्ट्रवादीचाच होणार - प्रशांत जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस, शहराध्यक्ष - पुणे शहर)

प्रशांत जगतापांचे यशस्वी नेतृत्व. राष्ट्रवादीचा एकतर्फी विजय. शिवसेनेला २२ धावांनी चारली धूळ. 

शिवसेनेची पडझड सुरुच. लागोपाठ तीन विकेट. 

शिवसेनेला तिसरा झटका. सचिन खैरे शून्यावर तंबूत. 

शिवसेनेची दुसरी विकेट. एका रन वर नानांची विकेट. 

शिवसेनेची अडखळती सुरुवात. तिसऱ्या ओव्हरनंतर १७ धावा आणि १ विकेट. शिवसेनेला विजयासाठी १८ बॉलमध्ये ३२ धावांची गरज. 

पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर शिवसेना धक्का. आकाश शिंदे झेलबाद. किशोर कांबळे यांनी पकडला सुंदर कॅच. 

शिवसेनेची टीम मैदानात. ओमराजे निंबाळकर आणि आकाश शिंदे बॅटिंगला. 

राष्ट्रवादीचा डाव संपला. ४८-२ (६ ओव्हर्स). शिवसेनेला विजयासाठी ४९ धावांची गरज. 

अनिकेत तटकरेंची जोरदार फटकेबाजी. १८ बॉलमध्ये २६ धावा. किशोर कांबळेंची चांगली साथ. 

राष्ट्रवादीची फटकेबाजी, ५ ओव्हर्समध्ये ४५ धावा. 

राष्ट्रवादीची टाॅस जिंकून बॅटिंग.

शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार फायनल. 

राष्ट्रवादीचा दणदणीत विजय आणि फायनलमध्ये प्रवेश. 

राष्ट्रवादीचा विजय निश्चित. १ बॉलमध्ये ७ धावा. 

उत्कंठा वाढवणारा सामना. ४ चेंडूमध्ये ७ धावांची गरज. 

लागोपाठ तिसरी विकेट. पोलिस प्रशासनाला ६ बॉलमध्ये ९ रन्स. 

सागर बालवडकर यांचा अप्रतिम झेल. तेगबिर यांची विकेट. १३ धावांवर बाद.  

राष्ट्रवादीची शानदार गोलंदाजी. धावा काढताना पोलिस प्रशासनाचा संघर्ष. विजयासाठी ९ बॉलमध्ये १० रन्स

पोलिस प्रशासन १२-० (२ ओव्हर्स). विजयासाठी २४ बॉलमध्ये २४ धावा.

राष्ट्रवादीकडून सुदर्शन पवार बॉलिंगला. 

पोलिस प्रशासनाकडून तेगबिरसिंग संधू आणि उल्हास कदम मैदानात. 

राष्ट्रवादीची टीम मैदानात. पोलिस प्रशासनाला रोखण्याचे आव्हान. 

राष्ट्रवादीचा डाव संपला. ६ ओव्हर्समध्ये ३५ धावा. ४ विकेट. पोलिस प्रशासनाला विजयासाठी ३६ धावांची गरज. 

राष्ट्रवादीच्या ५.२ ओव्हर्समध्ये केवळ २९ धावा. आणि चार विकेट. 

पोलिस प्रशासन संघाची शानदार गोलंदाजी. राष्ट्रवादीच्या फटकेबाजीला ब्रेक. 

राष्ट्रवादीचे १८ धावांत तीन गडी तंबूत. किशोर कांबळे, सागर बालवडकर आणि सुदर्शन पवार आऊट

दुसरी सेमीफायनल पोलिस संघ आणि राष्ट्रवादी यांच्यात सुरू

शिवसेनेचा दणदणीत विजय. सचिन अहिरांना खांद्यावर घेत शिवसेनेच्या टीमचा जल्लोष. फायनलमध्येही प्रवेश. 

शिवसेनेचा विजय निश्चित. ७ बॉलमध्ये एका धावेची गरज.

शिवसेनेला ८ बॉलमध्ये २ धावांची गरज. 

पाठोपाठ सचिन खैरे देखील आऊट. 

शिवसेनेचा विजयासाठी संघर्ष. ओमराजे निंबाळकर क्लिनबोल्ड. 

शिवसेनेला १८ बॉलमध्ये ५ धावा. 

खासदार ओमराजे निंबाळकर मैदानात. ४ ओव्हर्समध्ये शिवसेनेला केवळ ७ धावांची गरज. 

योगेश मोकाटे यांची विकेट. मनसेला पहिले यश. 

दोन ओव्हर्सनंतर शिवसेनेच्या १७ धावा. मनसेची शानदार गोलंदाजी. 

शिवसेनेचीही सावध सुरुवात. किशोर शिंदे यांची चकवणारी बॉलिंग.

शिवसेनेकडून सचिन खैरे आणि योगेश मोकाटे मैदानात. 

मनसेच्या ६ ओव्हर्समध्ये २५ धावा. शिवसेनेला २६ धावांची गरज. 

मनसेच्या ५ ओव्हर्समध्ये केवळ १६ धावा. २ विकेट्स

मनसेची पहिली विकेट. आक्रमक बाबु वागस्कर आऊट. 

तीन ओव्हर्समध्ये केवळ ९ धावा. मनसेची अत्यंत संथ सुरुवात.

मनसेची सावध सुरुवात. दोन ओव्हर्समध्ये केवळ ६ धावा. 

मनसेची टीम मैदानात. बॅटिंगसाठी बाबु वागस्कर आणि गजानन काळे बॅटिंगसाठी. 

शिवसेनेने टॉस जिंकला. पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय. 

सचिन अहिरांच्या नेतृत्वात शिवसेना फायनलमध्ये धडक मारणार का?

पुढील मॅच - सेमीफायनल १ - शिवसेना विरुद्ध मनसे. 

सचिन अहिरांनी पाजले बाळा नांदगावकरांना पाणी : ओमराजे निंबाळकर ठरले हिरो. 

बाळा नांदगावकर यांच्या टीमला ६४ रन्सचे टार्गेट. 

सचिन अहिर यांच्या टीमची मोठी फटकेबाजी. दोन गड्यांच्या मोबदल्यात ५७ धावांत केवळ २ गडी बाद. सहावी ओव्हर सुरु. 

सचिन अहिर यांच्या नेतृत्वात टीम बी मैदानात. यात खासदार ओमराजे निंबाळकर, सुदर्शन जगदाळे, संजय मोरे, अतुल लोंढे, उल्हास कदम, विपुल गायकवाड, सचिन चिखले अशा सर्वपक्षीय खेळाडूंचा समावेश. 

बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात टीम ए मैदानात. यात आमदार अमित झनक, खासदार संजय जाधव, गजानन काळे, निरंजन अडगळे, आबासाहेब कांबळे, अनिकेत तटकरे, सागर बालवडकर अशा सर्वपक्षीय खेळाडूंचा भरणा. 

सर्वपक्षीय खेळाडूंची मैत्रीपूर्ण मॅच. 

परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या हस्ते बाबु वागस्करांना सामनावीराचा पुरस्कार. 

मनसेचा जोरदार जल्लोष. बाबु वागस्करांना खांद्यावर घेत मनसेचा विजयोत्सव

मनसेने जिंकला सामना. बाबु वागस्कर ठरले सामनावीर. 

बाबु वागस्करांची जोरदार फटकेबाजी. पहिल्याच ओव्हरमध्ये विजयाकडे वाटचाल. 

मनसेची टीम मैदानात. बाबु वागस्कर आणि अखिल चित्रे बॅटिंगसाठी क्रिझवर

आम आदमीने केवळ २६ धावांवर खेळ संपवला. नियमानुसार मनसेला विजयासाठी २२ धावांची गरज. 

शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांची जबरदस्त गोलंदाजी. सरफराज शेख बाद. 

आम आदमीवर मोठा दबाव. ५ ओव्हर्सनंतर केवळ २३ धावा फलकावर. 

शैलेश मोहिते आणि मोहनिश येंदे दोघेही बाद.  

स्वप्निल गांगुरडे एका धावेवर धावबाद. आम आदमीची खराब सुरुवात. ७-२ (२ ओव्हर्स)

मनसेने काढली आपची पहिली विकेट. समीर आरवाडे शून्यावर आऊट. 

मनसेने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय. 

तर शैलेश मोहिते यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षाच्या टीममध्ये मोहनिश येंदे, सरफराज शेख, गोवर्धन गोसावी, समीर आरवाडे, गणेश थरकुडे, विजय भुमकर, स्वप्निल गांगुरडे अशा खेळाडूंचा समावेश आहे. 

आज क्रिकेटनामा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पहिला लीग सामना मनसे विरुद्ध आम आदमी पक्ष असा रंगणार आहे. गजानन काळे यांच्या नेतृत्वात मनसेची टीम मैदानात उतरली आहे. यात शहराध्यक्ष साईनाथ बाबर, अजय शिंदे, बाबु वागस्कर, किशोर शिंदे अशा खेळाडूंचा समावेश आहे. 

तर महसूल विरुद्ध पोलिस प्रशासन या सामन्यात पोलिसांच्या टीमने मोठा विजय संपादन केला. पोलिस प्रशासनाने ३२ धावांनी जिंकला सामना. महसूल प्रशासन : ३६-५ पोलिस प्रशासन : ६८ - २ अशी धावफलकाची स्थिती होती. 

पुण्यातील सुस येथील सनीज् वर्ल्ड येथील मैदानावर हे सामने रंगले. यात भाजप विरुद्ध शिवसेना अशा पहिल्या सामन्यात शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या टीमने भाजपचा मोठा पराभव केला. त्यानंतरच्या सामन्यात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या टीमने काँग्रेसच्या टीमवर ३३ धावांनी विजय मिळवला. 

पुणे : एरव्ही राजकीय मैदानात जोरदार गोलंदाजी-फलंदाजी करणाऱ्या राजकीय नेत्यांची काल सरकारनामा आयोजित क्रिकेटनामा स्पर्धेत प्रत्यक्ष क्रिकेटच्या मैदानातली कामगिरीही जोरदारपणे रंगली. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महसूल, पोलिस प्रशासन अशा सर्वच पक्षांच्या टीमने मैदानावरही जोरदार फटकेबाजी झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in