कोरोना बळींसाठी सानुग्रह अनुदान : पुणे जिल्ह्यातील १९ हजार कुटुंबांना मिळणार प्रत्येकी ५० हजार

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ही मदत देण्यात येणार आहे.
Pune corona
Pune corona Sarakarnama

सरकारनामा ब्यूरो

पुणे : कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० हजार रूपये देण्याची कार्यवाही राज्य सरकारच्यावतीने लवकरच केली जाणार आहे. राज्य सरकारच्यावतीने दिली जाणारी ही मदत संबंधितांच्या बँक खात्यावर या महिनाअखेरपर्यंत थेट पाठविली जाणार असून त्यासाठीची ऑनलाइन प्रक्रिया तयार करण्याचे काम सुरू आहे.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ही मदत देण्यात येणार आहे.

मदत व पूनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली असून थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्यासाठी आवश्‍यक संगणकप्रणाली विकसित करण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. या योजनेतून पुणे जिल्ह्यातील जवळपास १९ हजार कुटुंबांना प्रत्येकी ५० हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे. राज्य पातळीवर हा आकडा मोठा असून राज्यात गेल्या दीड र्वात जवळपास एक लाख ३८ हजार मृत्यू झाले आहेत. संपूर्ण राज्यात मदत केली जाणार असून त्यासाठी राज्य सरकारला सुमारे सातशे कोटी रूपये लागणार आहेत.

Pune corona
संघटनेतून काढून टाकण्याचा आधिकार शशिकांत पवारांना नाही : राजेंद्र कोंढरे

संगणकप्रणाली विकसित झाल्यानंतर जिल्हा परिषदा, महापालिाका तसेच नगरपालिका व नगरपरिषदा तसेच ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात राहणाऱ्या मृताच्या कुटुंबियांना मृत्यू दाखला आत्रर इतर आवश्‍यक माहिती ऑनलाइन अपलो करावी लागणार आहे. त्यानंतर संबंधितांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे.

मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना कोणतीही धावपळ न करता कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे ही मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असून कोरोना झाल्यानंतर एक महिन्याच्या आत मृत्यू झाला आहे. कोरोना झाल्यानंतर घरी किंवा रूग्णालयात मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर कोरोना टेस्ट घेतली आणि ती पॉझिटिव्ह आली अशा सर्वांना ही मदत दिली जाणार आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com