पंतप्रधान मोंदींची आवास योजना राबविण्यात भाजपच ठरले अपयशी

PMAY प्रकल्पाचे फक्त 1 टक्का काम पूर्ण झाले आहे.
Sanjog Waghere
Sanjog Waghere Sarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (PCMC) सत्ताधारी भाजपच्या (BJP) भ्रष्ट कारभारामुळे आणि चुकीच्या नियोजनामुळे पंतप्रधान आवास योजना (PMAY) शहरात यशस्वीपणे राबविता आली नाही. परिणामी गेल्या पाच वर्षात या योजनेतील कोणताही प्रकल्प पूर्ण झाला नाही. या आवास योजनेतून एकही घर शहरात कोणाला मिळाले नाही. त्यामुळे गोर-गरिबांच्या घराच्या स्वप्नावर पाणी फेरण्याचे काम भाजपने केले, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere) यांनी शुक्रवारी (ता.4 डिसेंबर) केला.

Sanjog Waghere
फडणवीस पुन्हा नाराज! नाशिकमध्ये असूनही साहित्य संमेलनाला जाणार नाहीत...

खोट्या भुलथापा देऊन शहरात सत्तेवर आलेल्या भाजप कारभा-यांना महापालिकेतील भ्रष्टाचारामुळे तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. पंतप्रधान आवास प्रकल्पातून वर्षात लोकांना घरे देण्याची वल्गना त्यांनी केली होती. त्यात त्यांनी ज्यादा दराने कंत्राटे देऊन भ्रष्टाचार केला. परिणामी, भ्रष्टाचार व टक्केवारीमुळे पिंपरी चिंचवडमधील या योजनेचा त्यांनी खेळखंडोबा केला, असा घणाघात वाघेरेंनी केला.

Sanjog Waghere
बलात्काराचा गुन्हा न नोंदविण्यासाठी लाच घेणाऱ्या महिला PSI ला कृष्णप्रकाशांचा दणका

रावेत येथे1,080 घरे बांधण्यासाठी पिपंरी-चिंचवड महानगरपालिकेने मे. मन इन्फ्रा. कन्स्ट्रक्शन लि. या कंपनीला कंत्राट दिले होते. या कामासाठी एकूण 79,45,92,790 रुपयांची निविदा काढण्य़ात आली होती. परंतु, सुमारे 9 कोटी रुपये ज्यादा दराने हे काम दिले गेले. 30 मे 2019 रोजी वर्कऑर्डर दिलेल्या या कामाला 30 महिन्यांची मुदत होती. ही मुदत संपुष्टात आली असून प्रकल्पाचे फक्त 1 टक्का काम पूर्ण झाले आहे. जागा ताब्यात नसताना निविदाप्रक्रिया का राबविली? न्यायालयाचे स्थगिती आदेश असताना सत्ताधारी भाजपने श्रेय लाटण्यासाठी 1,080 घरांसाठी सोडत का काढली? त्यावेळी गरिबांची दिशाभूल होऊ नये, म्हणून या सोडतीला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला होता.

आजही रावेत प्रकल्प जैसे थे स्थितीत आहे. केवळ राजकीय श्रेय लाटण्याकरिता भाजपने सोडत काढून धुळफेक केली. वास्तविक आज हा प्रकल्प होईल किंवा नाही, हा प्रश्न आहे. त्यांची फसवणूक करण्याचे काम भाजपने केले आहे. त्यांच्या सांगण्यावरून अधिकारी, सल्लागारांनी चुकीचे नियोजन केल्यामुळे हा प्रकल्प फसला. याकरिता सर्वस्वी सत्ताधारी भाजप जबाबदार असल्याचा आऱोप वाघेरे यांनी केला आहे.

पंतप्रधान आवास योजनेतील च-होली व मोशीतील बो-हाडेवाडीतील प्रकल्पही रखडले आहेत. च-होलीत १४४२ घरे असून हे काम देखील मे. मन इन्फ्रा. कन्स्ट्रक्शन लि.कंपनीकडेच आहे. त्यासाठी एकूण 132,50,00,000 रुपये इतका खर्च अदा केला जाणार आहे. या कामाची मुदत ऑक्टोबर 2020 मध्ये संपलेली असताना हे काम मुदतवाढीवर सुरू आहे. तरीही केवळ 35 टक्के काम पूर्ण झालेले आहे. बो-हाडेवाडी येथील 1,400 घरे बांधण्याचे काम मे. एस. जे. कॉन्ट्रॅक्टस प्रा. लि. कंपनीकडे आहे. त्यासाठी एकूण 112,19,23,406 इतका खर्च अदा केला जाणार आहे. येथे देखील केवळ 55 टक्के काम झाले आहे. या मोठ्या प्रकल्पापैकी एकही प्रकल्प सत्ताधा-यांना पूर्ण करता आलेला नाही. त्यांनी गतिमान कारभाराच्या नावाखाली केवळ तोंडाला पाने पुसण्याचे काम केली, अशी टीका वाघेरे‌ यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com