Sanjay Raut : संजय राऊतांना कोविडचा 'डोस' मिळणार? पुण्यातील एका पदाधिकाऱ्यासह दोघांची चौकशी सुरू

State Government : राज्य सरकारकडून राऊतांना अडकविण्याची तयारी सुरू
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

Maharashtra Politics : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकाराने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा अडकविण्याच्या प्रयत्न सुरू केला आहे. त्यातूनच राऊत यांच्याशी संबंधित कोविड काळातील विषय उकरून काढण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. त्यातूनच राऊतांच्या जवळच्या एका पदाधिकाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

कोविड काळातील त्यांचे आर्थिक लागेबांधे शोधण्यासाठी राऊतांच्या Sanjay Raut मर्जीतील आणि पुणे शहर शिवसेनेची जबाबदारी असलेल्या एका माजी पदाधिकाऱ्याला आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. तसेच या पदाधिकाऱ्यासोबत व्यवहार केलेल्या एका औषधविक्रेत्यालाही पोलिसांनी चौकशीला बोलावल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबईतील पत्राचाळ प्रकरणातून सुटलेल्या राऊत यांना आता कोविड घोटाळ्यावरून जोरदार 'इंजेक्शन' मिळण्याची शक्यता आहे.

Sanjay Raut
Bhandara : स्वतः पोलिसच भरवतात कोंबड बाजार, अन् तेसुद्धा चक्क फडणवीसांच्या जिल्ह्यात !

महाविकास आघाडी स्थापन केल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात खासदार संजय राऊत यांनी अग्रभागी राहून हल्ले केले. दरम्यान, पत्राचाळ प्रकरणी राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यातून त्यांना तब्ब्ल १०० दिवसांनी जामीन मिळाला होता. त्यानंतर आता खासदार संजय राऊत हे राज्य सरकारच्या रडावर आहेत.

राऊतांनी कोविड काळात सरकारचा फायदा घेऊन आपल्या मर्जीतील लोकांशी काही व्यवहार केल्याच्या संशयातून राज्य सरकारने चौकशी सुरू केली आहे. कोविड काळात लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस आणि इतरांवर सरकारचा संशय आहे. कागदांची फेरफार करून कंत्राट घेतल्याचा आरोप करण्यात येत आहेत.

दरम्यान, कोविड काळात १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यातूनही पुण्यातील राऊत यांच्या जवळचे राजीव साळुंखे आणि सुनील उर्फ बाळा कदम यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे मोठी कारवाई करून या दोघांना अटक केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com