संजय राऊतांनी स्वत:ला आवरावं अन्यथा ठोकून काढू; छावा संघटनेची थेट धमकी

छत्रपती संभाजीराजांना (Chhatrapati Sambhajiraje) खासदारकीपासून रोखण्याचं काम शिवसेना आणि संजय राऊतांनी (Sanjay Raut) केल्याचा आरोप जावळे-पाटील (Javle-Patil) यांनी केला.
Nanasaheb Javle-Patil
Nanasaheb Javle-PatilSarkarnama

पुणे : शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) मराठा समाजाविरोधात अभद्र शब्द वापरत आहेत. त्यांनी स्वत:ला आवरावं अन्यथा छावा संघटनेचे छावे त्यांना ठोकून काढतील, असा इशारा छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील (Nanasaheb Javle-Patil) यांनी आज पुण्यात बोलताना दिला. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उद्या मुंबईत येत आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी हजारो छावे उद्या मुंबईत दाखल होतील, असे जावळे-पाटील यांनी सांगितले.

Nanasaheb Javle-Patil
कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री भावूक : सर्वांनी सहकार्य केले, काही चुकलं असेल तर माफी

छत्रपती संभाजीराजांना खासदारकीपासून रोखण्याचं काम शिवसेना आणि संजय राऊतांनी केल्याचा आरोपही जावळे-पाटील यांनी केला आहे. ते म्हणाले, ‘‘ राज्यात शेतकरी मरत आहेत आणि राऊत राजकीय पोळी भाजत आहेत.मराठा समाजाविषयी खासदार राऊत कसलेही अभद्र शब्द वापरतात आहेत.त्यांनी स्वत:ला आवारावे, अन्यथा संघटनेचे छावे त्यांना ठोकून काढल्याशिवाय राहणार नाहीत.’’

Nanasaheb Javle-Patil
मंत्रीमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका; औरंगाबाद, उस्मानाबादसाठी ऐतिहासिक दिवस

आपल्या न्याय्य मागण्यांसाठी राज्यातील मराठा समाजाने लाखोच्या संख्येने मूक मोर्चा काढला. कुठेही तणाव निर्माण होऊ दिला नाही. मात्र, या मोर्चाला मुका म्हणून खासदार राऊत यांनी हिणवले होते. आमचा पक्षाला विरोध नाही सध्या जे सुरू आहे. त्यातून होणाऱ्या क्रांतीला आमचा पाठिंबा आहे, असे जावळे-पाटील यांनी सांगितले.

जावळे-पाटील म्हणाले, ‘‘ मुंबई तुमच्या बापची नाही. हा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे. खासदार राऊतांनी आपली टवाळकी बाहेर जाऊन करावी. राज्यात यापुढे ठाकरेशाही चालणार नाही.आम्ही सत्तेसाठी कधीही लाचारी स्वीकारली नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com