शरद पवार पुढाकार घेत नाहीत तोपर्यंत देशाला पर्यायी सरकार मिळणे अशक्य : संजय राऊत

Sanjay Raut | Shivsena | Sharad Pawar : महाराष्ट्राने देशाचे नेतृत्व करावे, ही बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती.
Sharad Pawar - Sanjay Raut
Sharad Pawar - Sanjay RautSarkarnama

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे जोपर्यंत पुढाकार घेत नाहीत तोपर्यंत देशातील सरकारला पर्याय मिळू शकत नाही, असे ठाम मत शिवसेना (Shivsena) नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रविवारी व्यक्त केले. ते पुण्यात ‘महाराष्ट्र कनेक्ट कॉन्क्लेव्ह २०२२’ या कार्यक्रमादरम्यानच्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वतः शरद पवार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. (Shivsena | Sanjay Raut Latest News)

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राने देशाचे नेतृत्व करावे, ही बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. पवार यांच्याकडे ती ताकद आहे. ते आणि आपण एकत्र आलो तर देशाला महाराष्ट्र झुकवू शकतो असे बाळासाहेब सांगायचे. सोबतच सत्तेतील आणि पूर्वीचे असे दोन्ही शरद पवार एकच आहेत. देशातील विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची ताकद पवार यांच्यात आहे. पवार यांनी पुढाकार घेतल्याशिवाय देशातील सरकारला पर्याय मिळू शकत नाही’’

‘महाविकास आघाडी होण्यापूर्वी भाजपशी बोलणी सुरु होती. ते शब्दाला जागणारे नाहीत, हे लक्षात आले होते. त्यावेळी महाराष्ट्रात बदल करायची ताकद ही शरद पवार यांच्यामध्ये आहे हे ओळखले होते. युतीत असताना भाजपची फसवणुकीची वृत्ती ओळखून होतो. त्यामुळे शिवसेना वेगळी भूमिका घेऊ शकते, हे दाखवून दिले. महाराष्ट्रात ताकद खूप आहे. महाराष्ट्र हाच देशाचा बुलंद आवाज होईल. इतकी राजकीय संकटे आले तरी कोणीही वाईट करू शकले नाही. आम्ही लढत आहोत. आता अडीच वर्षापूर्वीच्या मानसिकतेची भाजपने पुन्हा तयारी ठेवावी,’ असा टोला एका प्रश्‍नाच्या उत्तरात राऊत यांनी मारला.

बाळासाहेबांसोबत ३० वर्ष राहिलो आहे. साहजिकच आपल्यावर त्यांचा प्रभाव आहे. बाळासाहेब असते तर आज जे उद्योग सुरु आहेत ते करण्याची कोणाची हिंमत झाली नसती. अनेकांना त्यांच्यासमोर थरथर कापताना पाहिले आहे. असेही राऊत एका प्रश्‍नाला उत्तर देताना म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com