संजय राऊत यांनी आणला अमोल कोल्हेंच्या पोटात गोळा... पुढचे खासदार आढळरावच!

संजय राऊत यांनी आज मंचरमध्ये जाऊन माजी खासदार आढळरावांना आश्वस्त केले...
Sanjay Raut- Shivajirao Adhalrao
Sanjay Raut- Shivajirao Adhalraosarkarnama

मंचर : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे पुणे शहर किंवा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले की खळबळ उडवून देतात, असे आतापर्यंत दिसून आले आहे. त्यांनी आजही मंचर येथे बोलताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या पोटात गोळा आणला आहे. महाविकास आघाडीचे शिरूरमधील खासदार हे शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) हेच असतील, असे त्यांनी जाहीरही करून टाकले. (Sanjay Raut Latest news)

आढळराव यांच्यावतीने भरविण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धांना राऊत यांनी हजेर लावली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अनेक विषयांवर मते व्यक्त केली. पुढील निवडणुकांत महाविकास आघाडी कायम राहणार असल्याचा दावा त्यांनी केला. शिरूर लोकसभा मतदारसंघातही ही आघाडी असेल आणि आढळराव हेच खासदार असतील, असा दावा केला. राऊत यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये काय प्रतिक्रिया उमटणार, याची उत्सुकता आहे.

या वेळी बोलताना राऊत म्हणाले की राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग सुरू झाल्यापासून त्याविषयी शंका व्यक्त केली जात होती. हा प्रयोग अडीच महिनेही टिकणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. तेव्हापासून ठाकरे सरकार पडण्याची `तारीख पे तारीख` दिली जात आहे. आता 1 जूनला सरकार पडेल, अशी नवी तारीख दिली गेली आहे. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून असे सांगण्यात येत आहे. तरी आम्ही टिकून आहोत. त्यामुळे पुढील स्थानिक स्वराज्य निवडणुकांतही महाविकास आघाडी पाहायला मिळेल.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत ते म्हणाले की रोहित पवार अयोध्येला गेलेत ही चांगली गोष्ट आहे. आम्ही पण जाणार आहोत. सर्वांनीच जावं, कारण अयोध्या धार्मिक आहे. त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहू नये.

ईव्हीएम मशीन वर अनेकदा प्रश्न उपस्थित केला जातोय. म्हणूनच जनतेची बॅलेट पेपरवर निवडणूक व्हावी अशी मागणी आहे. आपलं मत कोणाला दिलंय हे प्रत्येक मतदाराला कळावं अशी प्रत्येकाची ईच्छा आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in