वाजपेयींच्या ओळींतून राऊतांचा मोदींवर बाण!

पोस्टमधील ओळी स्वतः अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या असून, सध्या देशात आणि राज्यात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राऊतांनी ही पोस्ट रिट्विट केल्याचं दिसत आहे.
Sanjay Raut, Atal Bihari Vajpayee, Narendra Modi

Sanjay Raut, Atal Bihari Vajpayee, Narendra Modi

sarkarnama

मुंबई : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज ९७ वी जयंती. यानिमित्ताने शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा देत असताना राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं. राऊतांनी एक पोस्ट रिटि्वट करीत मोदींच्या भूमिकेवर बोचरी टीका केली आहे.

वाजपेयी यांच्या जयंतीदिनी आज राऊतांनी एक पोस्ट शेअर करत मोदींवर टीका केली. या पोस्टमधील ओळी स्वतः अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या असून, सध्या देशात आणि राज्यात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राऊतांनी ही पोस्ट रिट्विट केल्याचं दिसत आहे.

'जिथे विरोध आणि विरोधकांना देशद्रोही समजण्याची वृत्ती असते, तिथे लोकशाही संपते आणि हुकुमशाही सुरू होते', अश वाजपेयी यांच्या ओळी आहेत. ही पोस्ट संजय राऊत यांनी रिट्विट करत अप्रत्यक्षपणे मोदी सरकारच्या भूमिकेवर बोचरी टीका केली आहे.

<div class="paragraphs"><p>Sanjay Raut, Atal Bihari Vajpayee,&nbsp;Narendra Modi</p></div>
चर्चा न करता कृषी कायदे करणं ही हुकुमशाहीच ; पवारांची मोदींवर टीका

सबका साथ सबका विकास’ हे फक्त त्यांनाच शोभतं,

''अटलबिहारी वाजपेयी हे हिंदुत्ववादी होते, पण ते धर्मांध नव्हते. हा देश सगळ्यांचा आहे, देशातील एकात्मता टिकली पाहिजे, याच भावनेने त्यांनी नेहमी काम केले. त्यामुळे जनता वाजपेयी यांच्याकडे एका पक्षाचा नव्हे तर संपूर्ण देशाचा नेता म्हणून पाहत असते. ‘सबका साथ सबका विकास’ हे फक्त त्यांनाच शोभतं, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. या विधानावरुन त्यांनी अप्रत्यक्षपणे मोदींवर निशाणा साधला आहे.

‘जातीयता आणि धर्मांधता बाजूला ठेवून राजकारण करता येते हे वाजपेयींनी शिकवले', असे म्हणत राऊत यांनी भाजप व मोदींना डिवचलं. राऊत शनिवारी मुंबईत माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ''पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर अटलबिहारी वाजपेयी हे खऱ्या अर्थाने लोकप्रिय नेते होते. उत्तम संसदपटू आणि माणुसकी काय असते, हे त्यांनी दाखवून दिले. हिंदुत्त्वाच्या विचारधारेशी त्यांनी कधी तडजोड केली नाही,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com