Sanjay Raut : भाजपाला सावरकर प्रेमाचा जो उमाळा आलाय ते सरळ सरळ ढोंग.. !

Sanjay Raut : आज राजकीय स्वार्थासाठी भाजप सावरकरवादी झाला.
Sanjay Raut,  Devendra Fadnavis    Latest news
Sanjay Raut, Devendra Fadnavis Latest news Sarkarnama

Sanjay Raut : स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाबाबत राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र 'सामना'तील रोखठोकमधून भाजप, राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर निशाणा साधला आहे. 'सावरकरांनी (Vinayak Savarkar) 10 वर्षे अंदमानच्या काळय़ा पाण्यावर नरकयातना भोगल्या. त्या देशासाठीच होत्या याचा विसर पडू नये,'असे राऊतांनी ठणकावले आहे.

खासदार संजय राऊत यांनी 'रोखठोक'मधून सावरकरांबाबत भाजप, आरएसएसने घेतलेल्या भूमिकेवर भाष्य केलं आहे. "वीर सावरकरांचे क्रांतिकार्य महान होते, पण आज भाजपास सावकराप्रेमाचा जो उमाळा आलाय ते सरळ सरळ ढोंग आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

यासोबत पंतप्रधान मोदी नेहरुंच्या बदनामीची भूमिका सोडत नाहीत. राहुल गांधींनी सावरकरांना त्याच कारणासाठी पकडले, हा देशाचा अजेंडा नाही, अशाने भारत कसा जोडणार? असा प्रश्न राऊतांनी विचारला आहे.

Sanjay Raut,  Devendra Fadnavis    Latest news
Gulabrao Patil : पाच आमदार आले नसते तर माझा कार्यक्रम आटोपला असता ; बंडखोरीबाबत गुलाबरावांचा मोठा खुलासा

"वीर सावरकरांवर नाहक टीका करुन राहुल गांधी यांनी वादळ ओढवून घेतले. ‘भारत जोडो’ यात्रेचा तो अजेंडा नव्हता. भारतीय जनता पक्ष सावरकरांच्या अपमानाविरुद्ध रस्त्यावर उतरला. सावरकरप्रेमाचे हे ढोंगच म्हणावे लागेल. संघ सावरकरांचा कठोर टीकाकार राहिला, पण आज राजकीय स्वार्थासाठी भाजप सावरकरवादी झाला,'' असे राऊत म्हणाले.

रोखठोक मध्ये संजय राऊत म्हणतात..

  • सावरकरांचे वंशज एरवी कोठे दिसत नाहीत. राहुल गांधींनी सावरकरांवर वक्तव्य केले की, त्यांचा चेहरा वृत्तवाहिन्यांवर दिसतो. आठ वर्षांपासून भाजपचे राज्य केंद्रात आहे, पण सावरकरांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करून माफीचा डाग धुऊन काढावा असे ढोंगी सावरकर भक्तांना वाटत नाही.

  • सावरकरांनी दशकभर अंदमानात ज्या यातना सहन केल्या त्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवाहलाल नेहरूंना लक्ष्य केले, तर राहुल गांधी वीर सावरकरांना लक्ष्य करीत आहेत.

  • स्वातंत्र्य लढ्यात दोघांचे योगदान तोलामोलाचे आहे. सावरकरांनी तर सर्व सुखाचा त्याग करून अंदमानचा मार्ग स्वीकारला. पुन्हा तुरुंग काय असतो याची कल्पना नसलेले सावरकरांच्या सुटकेवर बोलतात तेव्हा आश्चर्य वाटते.

  • 10 वर्षांपेक्षा जास्त काळ अंदमानात नरकयातना (देशासाठी) भोगल्यावर सावरकरांनी ‘डावपेच’ म्हणून दिलगिरी व्यक्त करून सुटकेचा मार्ग निवडला असेल तर त्यास शरणागती-माफीनामा म्हणता येणार नाही.

  • आज ‘ईडी’सारख्या स्वतंत्र हिंदुस्थानातील तपास यंत्रणांच्या भयाने भले भले एका रात्रीत ‘स्वदेशी’ सरकारला शरण जातात. पक्ष बदलतात. स्वतःच्या निष्ठा विलीन करतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com