"स्टंम्प्सच्या मागून बॅट्समनच्या विकेट काढायला आवडतात" : राऊतांनी गाजवलं क्रिकेटचे मैदान

Sanjay Raut | Shivsena : मला उद्धव ठाकरे यांच्याच संघात खेळायला आवडेल...
"स्टंम्प्सच्या मागून बॅट्समनच्या विकेट काढायला आवडतात" : राऊतांनी गाजवलं क्रिकेटचे मैदान
Sanjay Raut cricket Stadium sarkarnama

शिरुर : मागील काही काळापासून सातत्याने राजकारणाचे मैदान गाजवणारे शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल क्रिकेटचे (Cricket) मैदान गाजवत जोरदार फटकेबाजी केली. काल शिरुर लोकसभा मतदारसंघातील लांडेवाडी, (ता.आंबेगाव) इथे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शिवसंग्राम प्रीमियर क्रिकेट लीग २०२२ ला भेट देत शिरूर (Shirur) लोकसभा मतदार संघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी खेळ सुरु होण्यापूर्वी मैदानात राऊत यांनी खेळाचा आनंद लुटला. खेळानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, क्रिकेटमधील आपल्याला जास्त कळत नाही, पण मला उद्धव ठाकरे यांच्याच संघात कायमस्वरुपी खेळायला आवडेल, आणि या खेळात मला स्पंम्प्सच्या मागे उभं राहुन विरोधी टीममधील बॅट्समनच्या विकेट्स काढायला आवडतील, अशी खोचक प्रतिक्रिया दिली. तसेच राजकारण हे क्रिकेट सारखे असून राजकारणात देखील वाईड, बाऊंन्सर, फ्री हिट, गुगली असे बॉल्स असतात असेही ते म्हणाले.

Sanjay Raut cricket Stadium
उर्जा विभागाची तत्परता! थकीत वीजबिलाच्या यादीतून अजित पवारांचे नाव २ तासात हटवलं

याप्रसंगी राऊत यांनी शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या कार्यचे कौतुक केले. ते म्हणाले, राष्ट्रीय स्तरावरील सर्व निवडणुका एकत्र लढविण्यावर महाविकास आघाडीची एकमत झाले आहे. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कामाची नोंद इतिहासात झाली आहे. कोणी काहीही बोलले तरी आढळराव पाटील हे पुढील वेळी खासदार म्हणून संसदेत असतील. लोकसभा निवडणुकीत पराभव होऊन देखील दुसऱ्याच दिवशी पासून पराभव बाजूला सारून ते जनसेवेच्या कामाला लागले, इथल्या लोकांशी त्यांची नाळ किती घट्ट जुळून आहे हे यावरून दिसून येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.