पुण्यात सत्ता येण्यासाठी दस का दम दाखवावा लागेल..

पुण्यात आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात बोलतांना संजय राऊत (Sanjay Raut) यांची जोरदार फटकेबाजी.
Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama

पुणे : पुणे महानगरपालिकेत (PMC) सत्ता येण्यासाठी आपल्याला दस का दम दाखवावा लागेल. सत्तेसाठी नगरसेवकांचा असा आकडा गाठावा लागेल की आपलाच महापौर होईल. अजितदादा (Ajit Pawar) आणि पवार साहेबांशी (Sharad Pawar) युतीसंदर्भात रितसर बोलून पालिका निवडणुकीत आघाडी करू. सन्मानाने आघाडी झाली तर उत्तमच आहे, अन्यथा शिवसेना स्वतंत्र लढेल. बाळासाहेबांचे सर्वाधिक प्रेम असणाऱ्या पुण्यावर भगवा फडकवण्याची आता वेळ आली असल्याचे मत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुण्यातील वडगाव शेरी येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात व्यक्त केले.

Sanjay Raut
गुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो, मग महाराष्ट्राचा का नाही? ः संजय राऊत

यावेळी विधीमंडळाच्या उपसभापतील डॉ. निलम गोर्हे, उपनेते रविंद्र मिर्लेकर, संपर्क प्रमुख सचिन आहीर, उपसंपर्क प्रमुख अदित्य शिरोडकर, उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक, शिवसेना शहराध्यक्ष गजानन थरकुडे, संजय मोरे, माजी मंत्री विजय शिवतारे, शशिकांत सुतार, चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, तृष्णा विश्वासराव, संजय भोसले, सचिन भगत, आनंद गोयल, अॅड. सतीश मुळीक, व अन्य शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

राऊत म्हणाले, विरोधकांनी कितीही आपटली तरी सरकार पडत नाही. महाविकास आघाडी सरकार हे आपला कार्यकाळ पुर्ण करेल. 2024 मध्येही ठाकरेच मुख्यमंत्री होतील. सत्तेत येण्याची स्वप्न विरोधकांनी पाहू नये. पुण्यात शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह असतो. मात्र, पुण्यात दहाच नगरसेवक असल्याची त्यांनी खंत व्यक्त करत, पुण्यात सत्ता आणण्यासाठी आपल्याला दस का दम दाखवावा लागेल. याबरोबरच कार्यकर्त्यांना अजित दादांकडे काम घेऊन जा, ते काम करतील. शिवसैनिकांची कामे करा, असा निरोप उद्धव ठाकरे हे अजित दादांना देतील असेही आवर्जून सांगितले

Sanjay Raut
चंद्रकांत पाटलांवर त्यांच्या लायकीनुसार सव्वा रुपयाचा दावा ठोकणार: संजय राऊत

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपयाच्या दाव्यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले की, चंद्रकात पाटलांवर मी त्यांच्या ऐपतीनुसार सव्वा रूपयाचा दावा लावला आहे आणि सव्वा रूपया घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. देशाच्या इतिहासातील हा सर्वात कमी रकमेचा दावा आहे. मात्र, मी तो सव्वा रूपया जाहीरपणे घेणारच आहे, कारण मी कुठलाही खटला हरत नाही, तो राजकीय असेल किंवा कोर्टातील असो. मी राजकारणातसुद्धा दोन वर्षांपूर्वी राज्यातील मुख्यमंत्री शिवसेनेचा करून भाजपला हरवले आहे. मला तुमचे शंभर कोटी नकोत. बाळासाहेबांनी मला सर्वकाही दिले आहे. चंद्रकांतदादा म्हणाले की संजय राऊतांनी त्यांची किंमत वाढवावी. पण, आमची किंमत काय आहे ते मी आणि उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षापूर्वीच तुम्हाला दाखवली आहे, असा चिमटासुद्धा त्यांनी पाटील यांना काढला.

यावेळी संजय राऊत यांच्याबरोबर, नीलम गोऱ्हे आणि सचिन अहिर यांनी भाजपवर शिवसेनेच्या स्टाईलने टीका केली. गोऱ्हे यांनी आमदार सुनील कांबळे यांचा प्राणी असा उल्लेख केला. सचिन अहिर यांनी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे नाव न घेता, राऊत यांना पुण्यात फिरू न देण्याची धमकी देणारा येथील प्राणी पळून गेला का, असा टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com