अनुमोदकामुळे संजय काळेंची बिनविरोधची संधी हुकली अन्‌ कट्टर विरोधकाशी गाठ पडली!

पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालकपदासाठी संजय काळे आणि रघुनाथ लेंडे यांच्या लढत होणार
Sanjay Kale-Raghunath Lende
Sanjay Kale-Raghunath LendeSarkarnama

नारायणगाव (जि. पुणे) : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे यांचा उमेदवारी अर्ज वैध असल्याचा निकाल मंगळवारी (ता. ७ डिसेंबर) रात्री उशिरा निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी जाहीर केला. त्यामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Pdcc Bank) संचालकपदाच्या निवडणुकीसाठी सोसायटी अ गटातून महाविकास आघाडीचे उमेदवार, राष्ट्रवादीचे नेते (ncp), जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय शिवाजीराव काळे व माजी सभापती रघुनाथ लेंडे यांच्यातच लढत होणार असल्याचे आज रात्री निश्चित झाले. (Sanjay Kale and Raghunath Lende will be fight for post of director of Pune District Bank)

जुन्नर तालुक्यात सोसायटीचे ७६ मतदार आहेत. निवडणुकीसाठी सभापती काळे व माजी सभापती लेंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सभापती काळे यांनी एकूण ३४ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. काळे यांना अनुमोदक असलेल्या एका मतदाराने लेंडे यांच्या उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून सही केली होती. अर्ज छाननीदरम्यान सभापती काळे यांनी या बाबत हरकत घेतली होती. निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी ही हरकत फेटाळून लावून लेंडे यांचा अर्ज वैध असल्याचा निकाल जाहीर केल्याने सभापती काळे यांच्या बिनविरोध निवडीला खो बसला आहे. यामुळे कट्टर राजकीय विरोधक असलेले सभापती काळे व माजी सभापती लेंडे यांच्यात लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

Sanjay Kale-Raghunath Lende
पाहिल्याच दिवशी दोघांची माघार अन्‌ सतेज पाटलांची बिनविरोध निवड पक्की!

मागील दोन निवडणुकीत सभापती संजय काळे विजयी झाले होते. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सभापती काळे यांचे वडील माजी आमदार (स्व.) शिवाजीराव काळे हेसुध्दा जिल्हा बँकेचे सुमारे पन्नास वर्षे संचालक होते. यामुळे जुन्नर तालुक्याच्या सहकारावर सभापती काळे यांचे वर्चस्व राहिले आहे. जिल्हा बँकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत माजी सभापती लेंडे यांचा सभापती काळे यांनी पराभव केला होता. काळे व लेंडे यांच्यात दुसऱ्यांदा लढत होत आहे. यामुळे या लढतीकडे लक्ष लागले आहे.

Sanjay Kale-Raghunath Lende
राष्ट्रवादीच्या रेवणनाथ दारवटकरांची सलग सातव्यांदा बाजी!

सभापती काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार अतुल बेनके, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर व सोसायटीचे ७६ पैकी ७४ मतदार उपस्थित होते. बिनविरोध निवड करण्यासाठी आमदार बेनके यांनी प्रयत्न केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com