संजय जगतापही बिनविरोध : वळसे पाटलांपोठापाठ आणखी एका जागेचे टेन्शन कमी

पुरंदर सोसायटी मतदार संघातून संजय जगताप यांचा एकमेव अर्ज
Sanjay Jagtap
Sanjay JagtapSarkarnama

पुणे : पुरंदरचे काँग्रेस आमदार संजय जगताप हे देखील बिनविरोध जिल्हा बँकेवर निवडून गेले आहेत. पुरंदर सोसायटी मतदार संघातून त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. काल ६ डिसेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. संजय जगताप (Sanjay Jagtap) यांच्या निवडीनंतर महाविकास आघाडीचे आणखी एका जागेचे टेन्शन कमी झाले आहे. यापुर्वीच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २९ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून मुदत ६ डिसेंबरपर्यंत होती. अर्जांची छाननी ७ तारखेला होऊन २२ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. २३ डिसेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होणार असून २ जानेवारी २०२२ रोजी मतदान व ४ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. अद्याप अर्ज माघारी घेण्याची मुदत १५ दिवसांवर असल्याने अजून किती जागा बिनविरोध होणार का? याकडे लक्ष लागले आहे.

Sanjay Jagtap
हर्षवर्धन पाटलांमुळे ताकद वाढलेल्या आप्पासाहेब जगदाळेंनी भरला अर्ज : राष्ट्रवादीच्या डावपेचाकडे लक्ष!

दिलीप वळसे पाटील बिनविरोध :

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse patil) यांचीही पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. आंबेगाव सोसायटी मतदारसंघातून त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशीपर्यंत त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या विजयाची केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. त्यांच्या गटात ५७ मतदार होते.

Sanjay Jagtap
कालपर्यंत शिवेंद्रसिंहराजेंची चर्चा, आज अध्यक्षपदी नितीन पाटील बिनविरोध...

या सगळ्या घडामोडींमुळे यंदाच्या हंगामातील बिनविरोध निवडून जाणारे दिलीप वळसे पाटील पहिले मंत्री ठरले आहेत. ते जवळपास १९९१ पासून जिल्हा बँकेवर संचालक म्हणून कार्यरत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) हे देखील जिल्हा बँकेच्या रिंगणात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com