
पुणे : पुण्यात सरकारनामा आयोजित क्रिकेटनामा स्पर्धेत काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेते पुरंदरचे आमदार संजय जगताप आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांची जोडी जमलेली पाहायला मिळाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात बळ कमी झालेली काँग्रेस सरकारनामाच्या मैदानात मात्र या दोघांच्या नेतृत्वात मोठ्या ताकदीने या उतरलेली आहे.
काँग्रेसच्या टीममध्ये संग्राम थोपटे, संजय जगताप, अजित जाधव, अमित बागल, भूषण रानभरे, राहुल सिरसाठ, संजय बालगुडे, संजीव जगताप, उमेश काशिद या सर्व तरुण तुर्क खेळाडूंचा समावेश आहे. दरम्यान काँग्रेसने नाणेफेक जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान फिल्डिंगचा निर्णय सार्थ ठरवतं क्रिकेटनामा स्पर्धेत राष्ट्रवादी काँग्रेसची अडखळती सुरुवात झाली. सुदर्शन पवार आणि मंत्री धनंजय मुंजे हे दोघेही रनआऊट झाले. तर आमदार अनिकेत तटकरे हे मैदानावर पाय रोवून उभे राहिलेले पाहायला मिळाले.
या स्पर्धेच्या भाजप विरुद्ध शिवसेना या पहिल्या सामन्यात भाजपने शिवसेनेला ३५ धावांचे आव्हान दिले होते. यात शिवसेनेच्या खासदार धैर्यशिल माने यांनी तुफान फटकेबाजी करत संघाला ९ विकेट्सने विजय मिळवून दिला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.