...तर गाठ माझ्याशी! संभाजीराजे ऐतिहासिक चित्रपटांवर भडकले

Chhatrapati Sambhajiraje : सिनेमॅटीक लिबर्टी, व्यक्तिस्वातंत्र्य आहे म्हणून आपण काहीही करायचं का?
Chhatrapati Sambhajiraje
Chhatrapati SambhajirajeSarkarnama

पुणे : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज छत्रपती शिवाजीमहाराजांच्या इतिहासावर निर्माण येऊ घातलेल्या चित्रपटांवर जोरदार टीका केली आहे. हर हर महादेव आणि वेडात मराठे वीर दौडले या दोन चित्रपटांवर त्यांनी जोरदार आक्षेप घेतला.

“जर यापुढेही त्यांनी असेच चित्रपट येत राहिले तर गाठ माझ्याशी आहे. आता काढून तर बघा. मीच यांना आडवणार. काहीही झालं तरी, असा चुकीचा इतिहास लोकांसमोर पुन्हा आणलात तर याद राखा,”, असा गर्भित इशाराच संभाजीराजेंनी दिला.

Chhatrapati Sambhajiraje
आगरी समाजाच्या मतांसाठी आग्रह धरला तो आता का नाही?; भोईरांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले...

संभाजीराजे आणखी काय म्हणाले?

सिनेमॅटीक लिबर्टी, व्यक्तिस्वातंत्र्य आहे म्हणून आपण काहीही करायचं का? भालजी पेंढारकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. यात आमची सुद्धा चूक आहे. आपल्या लोकांची देखील चूक आहे. आपण शिवरायांची पुस्तके वाचत नाहीत. वा.सी.बेंद्रे, मेंधळे, जयसिंगराव पवार सर असतील, या लोकांनी इतिहासलेखन करताना आयुष्य पणाला लावलं. लोकांना नाट्यरुपांतर रूचतं म्हणून, काही करून इतिहासात फेरफार करणार का? असे संभाजीराजे म्हणाले.

Chhatrapati Sambhajiraje
Nanded : प्रकाश आंबेडकर म्हणाले, काॅंग्रेसचे आता काहीच शिल्लक राहिलेले नाही..

'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाचा पोस्टर दाखवत संभाजीराजे म्हणाले की, तुम्हाला मावळ्यांच्या डोक्यावर पगडी दिसतेय का? पगडी काढणे म्हणजे शोकसंदेश आहे. माझी राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांना विनंती आहे की, ऐतिहासिक चित्रपट काढायचे असतील तर नक्की कराच. पण चित्रपट सेन्सॉर बोर्डवर ऐतिहासिक विषयक तयार करायला पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com