Sambhaji Brigade : संभाजी ब्रिगेडचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन; शरद पवारांसह दिग्गजांची उपस्थिती

Sambhaji Brigade : राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी या अधिवेशनाला उपस्थित राहणार
Sambhaji Brigade
Sambhaji Brigade Sarkarnama

संभाजी ब्रिगेडचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन २८ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन गणेश कला क्रीडामंच येथे होणार आहे. या अधिवेशनाला राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी उपस्थिती लाभणार आहे. या अधिवेशनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ज्येष्ठ अभिनेते भरत जाधवांसह अनेक मान्यवरांना गौरविण्यात येणार आहे. याविषयीची माहिती संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) चे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिली आहे.

Sambhaji Brigade
Ajit Pawar : अजित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना वगळले : अधिवेशनातील धक्कादायक प्रकार!

संभाजी ब्रिगेडचे रौप्यमहोत्सवी अधिवेशनाचे उद्घाटन 28 डिसेंबरला सकाळी १० वाजता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.

या अधिवेशनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar),खासदार श्रीनिवास पाटील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, ज्येष्ठ विचारवंत आ.ह. साळुंखे, इतिहास संशोधक प्रा.मा. म. देशमुख, डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, इंदोरचे श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर, तंजावरचे युवराज संभाजीराजे भोसले आदी मान्यवर अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीत सायंकाळी साडेपाच वाजता अधिवेशनाचा समारोप होणार आहे.

Sambhaji Brigade
Anandrao Adsul : माजी खासदार आनंदराव अडसूळांच्या अडचणीत वाढ; अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

मराठी चित्रपट अभिनेते भरत जाधव यांना जीवनगौरव पुरस्काराने तर, अभिनेते अशोक समर्थ आणि प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

या अधिवेशनात दुपारी १२ वाजता अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा या संकल्पनेवर आधारित खासगीकरण, जागतिकीकरणानंतरचा भारत आणि जग, दुपारी २.३० वाजता एकविसावे शतक- स्टार्टअपचे युग आणि ३.३० वाजता मराठा कम्युनिटी-बिझनेस कम्युनिटी या विषयावर चर्चासत्राचे होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com