Sambhaji Brigade : 'बहुजन महापुरूषांची बदनामी करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींची हकालपट्टी करा!'

Sambhaji Brigade : थेरगाव येथे हे जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
Sambhaji Brigade
Sambhaji BrigadeSarkarnama

पिंपरीः छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकत्याच केलेल्या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद सध्या राज्यभर उमटत आहेत. उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडही त्याला अपवाद राहिलेले नाही. संभाजी ब्रिगेडने कोश्यारींच्या प्रतिमेला काल शहरात जोडे मारले. तसेच त्यांच्या हकालपट्टीची मागणीही केली.

Sambhaji Brigade
Banks NPA News : पाच वर्षांत बँकांचे तब्बल १० लाख कोटी कर्ज माफ; 'या' बँकांचा समावेश

थेरगाव येथे हे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. राज्यपालांप्रमाणेच शिवरायांविषयी आक्षेपार्ह बेताल वक्तव्य करणारे भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचाही यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. राज्यपाल वांरवार बहूजन समाजाच्या महापुरुषांची बदनामी करीत असल्यामुळे त्यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करावी, अशी मागणी यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे यांनी केली. तसेच या शिवद्रोही राज्यपालांना आता राज्यात फिरु देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Sambhaji Brigade
Pandharpur News : सोलापूर शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत माजी आमदार सावंतांच्या पॅनेलची बाजी!

कोश्यारींनी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी नुकतीच औरंगाबाद येथे केली. यापूर्वीही त्यांनी समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेंगा असे वक्तव्य करून छत्रपती शिवरायांचा अवमान केला होता. तसेच सावित्रीमाई व फुले महात्मा फुले यांच्याबाबतीतही अवमानकारक वक्तव्य केले होते, याची त्यांनी आठवण करून दिली.

ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश हांडे, प्रदेश संघटक अजय भोसले यांनी देखील अतिशय तीव्र शब्दात आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. ब्रिगेडचे दक्षिण पुणे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सांवत उत्तर जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे, पुणे शहराध्यक्ष हर्षवर्धन मगदुम, जिल्हा उपाध्यक्ष अशोक काकडे, सचिव गणेश कुंजीर, कार्याध्यक्ष अनिल माने आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com